राज्यातील मुख्याध्यापकांचे उद्यापासून शिर्डी येथे अधिवेशन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 ऑक्टोबर 2017

शिर्डी - राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापकांच्या अधिवेशनास शुक्रवार (ता. 27) पासून येथे प्रारंभ होत आहे. तीन दिवस चालणाऱ्या या अधिवेशनात कोकण व मुंबई वगळता राज्यातील विविध जिल्ह्यांतून सुमारे दोन हजार मुख्याध्यापक सहभागी होतील, अशी माहिती मुख्याध्यापक संघाचे पदाधिकारी भालचंद्र औताडे व लालचंद आसावा यांनी दिली. या अधिवेशनात बदलते शिक्षण प्रवाह, नववी व दहावीचा पुनर्रचित अभ्यासक्रम, परीक्षांचे बदलते स्वरूप, संगणकीय ऑनलाइन माहिती नोंदी अडचणी व उपाय, प्रचलित मूल्यमापन पद्धती दोष व उपाय आदी विषयांवर चर्चा होईल. काही मुख्याध्यापक शोधनिबंध सादर करतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, साईबाबा संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे आदींना या अधिवेशनासाठी निमंत्रित करण्यात आले आहे.