साईसमाधी शताब्दीसाठी नव्या अधिकाऱ्यांचे पथक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 जुलै 2017

शिर्डी - तीन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या साईसमाधी शताब्दी सोहळ्यानिमित्त राज्य सरकारने संस्थानच्या सेवेत नव्या अधिकाऱ्यांचे पथक नियुक्त केले आहे. त्यात दोन उपजिल्हाधिकारी, प्रत्येकी एक कार्यकारी अभियंता आणि एक पोलिस उपअधीक्षक यांचा समावेश आहे.

त्यापैकी तीन अधिकारी बुधवारी रुजू झाले. अधिकारी आले; मात्र सरकारी निधीची प्रतीक्षा कायम आहे. एकूण तीन हजार कोटी रुपयांच्या विकास आराखड्यापैकी सुमारे अठराशे कोटी रुपये खर्चाची विकासकामे साईबाबा संस्थान करणार आहे. किमान या कामांना सुरवात व्हावी, अशी शिर्डीकरांची अपेक्षा आहे.

नाशिक येथे नोंदणी महानिरीक्षक असलेले धनंजय निकम व फैजपूर येथील प्रांताधिकारी मनोज घोडे काल (मंगळवारी) येथे उपजिल्हाधिकारी म्हणून रुजू झाले. रत्नागिरी जिल्हा परिषदेतील कार्यकारी अभियंता आर. एस. घुले यांनीही पदभार स्वीकारला.