साईबाबा विश्‍वस्त मंडळाच्या बैठकीवर शिर्डीकरांचा मोर्चा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 जून 2017

शिर्डी - 'साईसमाधी शताद्बी विकास आराखड्यावर कार्यवाही होत नसल्याचा आक्षेप घेत शिर्डीतील सर्वपक्षीय पदाधिकारी आज एकत्र आले. विश्‍वस्त मंडळाच्या बैठकीवर मोर्चा नेत "पोकळ घोषणा पुरे, कृती कधी करणार ते सांगा,'' अशा शब्दांत त्यांनी विश्‍वस्त मंडळाला जाब विचारला.

याबाबत माजी नगराध्यक्ष कैलास कोते म्हणाले, 'विश्‍वस्त मंडळाकडून शिर्डीकरांचा भ्रमनिरास झाला आहे. प्रसारमाध्यमांतून काल्पनिक घोषणा सुरू आहेत. महत्त्वाची कामे तशीच पडून आणि फुटकळ कामांना प्रसिद्धी दिली जाते. मंडळाचा कार्यकाल तीन वर्षांचा असताना वैद्यकीय महाविद्यालय व कॅन्सर रुग्णालय कसे उभारणार? संस्थानच्या रुग्णवाहिकांना धक्का मारावा लागतो. अध्यक्ष मात्र पाचशे रुग्णवाहिका वाटण्याची घोषणा करतात. साईसमाधी शताब्दीच्या तयारीबाबत विश्‍वस्त मंडळाने यापुढे सर्वपक्षीय समितीशी चर्चा करावी. घोषणा सुरू आणि काम बंद, अशी स्थिती राहिली, तर नागरिक आंदोलन करतील.''