शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 जानेवारी 2017

कोल्हापूर - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना शहर कार्यकारिणीतर्फे शिवसेनेच्या शनिवार पेठेतील शहर कार्यालयात त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. 

सकाळी शहर कार्यालयात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस दीपक गौड व ऋतुराज क्षीरसागर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. या वेळी जय भवानी जय शिवाजी, शिवसेना जिंदाबाद यासह ठाकरे अमर रहे, अशा घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. 

या वेळी श्री. गौड म्हणाले, ""कुंचल्याच्या फटकाऱ्याने, लेखणीतील अंगाराने, कणखर नेतृत्वाने आणि रोखठोख ठाकरी शैलीने राज्यातच नव्हे तर देशात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दबदबा निर्माण केला. शिवसेनेच्या स्थापनेनंतर मराठी माणूस ताठ मानेने जगू लागला. त्यांचे विचार राज्यात मर्यादित न राहता देशभर पसरले. त्यांच्या विचारांचे अनुकरण करण्याची गरज युवा पिढीला आहे.'' 

या वेळी ऋतुराज क्षीरसागर, जयवंत हारुगले, सुनील जाधव, तुकाराम साळोखे, रणजित जाधव, दीपक चव्हाण, अनिल चव्हाण, अनिल पाटील, किशोर घाटगे, सुनील भोसले, गजानन भुर्के यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

जिल्हा शिवसेनेतर्फेही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. या वेळी संजय पवार, आमदार चंद्रदीप नरके, शिवाजी जाधव, रवी चौगुले, राजू यादव, दत्ताजी टिपुगडे, विराज पाटील, विनोद खोत, शुभांगी पोवार, रिया पाटील, अवधूत साळोखे, किरण माने, सलीम सय्यद, शैलेश पुणेकर आदी उपस्थित होते.

Web Title: Shiv Sena chief Bal Thackeray remembrance