शिवसेनेच्या दिगंबर ढवण यांचा पत्नीसह राजीनामा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 मे 2018

नगर : महापौर सुरेखा कदम व संभाजी कदम यांच्या कार्यपध्दतीवर आक्षेप घेत शिवसेना उपशहर प्रमुख दिगंबर ढवण यांनी पदाचा व प्राथमिक सदस्यत्वाचा आज राजीनामा दिला. त्यांचासह पत्नी शारदा ढवण यांनीही नगरसेवक पदाचा व त्यांच्या कार्यकर्त्यांनीही पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. ढवण यांनी रात्री उशिरा सकाळशी बोलताना ही माहिती दिली. 

दरम्यान ढवण व त्यांच्या पत्नीची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली असल्याने वृत्त सोशल मीङियातून पसरले होते. त्या संदर्भात पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रा. शशिकांत गाङे यांच्याशी संपर्क होवू शकला नाही.

पक्षाचे संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर हा वाद मिटविण्यासाठी रात्री उशिरा नगरला पोचले. मात्र त्यांनी ढवण यांना भेटण्यासाठी वेळच दिली नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांनी ढवण यांना रात्री साङेअकरा वाजता प्रा. गाङे याच्याकङे राजीनामा देण्याचा आग्रह  धरला. ढवण यांनी या वृत्ताला दुजोरा दिला.

काल महापौर सुरेखा कदम यांच्या दालनात कदम व ढवण यांच्यात शाब्दिक चकमक उडाली होती. त्यावेळी झालेल्या वादातून महापौर कदम यांनी रङतच कार्यालय सोडले होते.

Web Title: Shiv Sena leader quits party in Nagar