शिवसेनेचा निर्णय गुरुवारी होणार 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 फेब्रुवारी 2017

कोल्हापूर - जिल्हा परिषदेच्या राजकारणात शिवसेना कोणती भूमिका घेणार, याचा निर्णय गुरुवारी (ता. 2) कोल्हापूर दौऱ्यावर असलेले पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत होईल. या निवडणुकीचा निकाल व तालुकानिहाय झालेल्या परिस्थितीसंदर्भात आज जिल्हाप्रमुखांनी सहसंपर्कप्रमुख प्रा. संजय मंडलिक यांच्याशी चर्चा केली. या बैठकीनंतर अहवाल श्री. ठाकरे यांना पाठवून त्याबाबत गुरुवारी चर्चा करण्याचे ठरले. 

जिल्हा परिषदेत दहा जागा जिंकून शिवसेनेने सत्तेच्या चाव्या आपल्या हातात ठेवल्या आहेत. राज्य पातळीवर सेना-भाजप युती झाली तर सेनेला उपाध्यक्षपद नक्की मिळेल. पण युती न झाल्यास काय करायचे, याबाबत दोन दिवसांपूर्वी सेनेच्या पाच आमदारांची बैठक प्रा. मंडलिक यांच्या निवासस्थानी झाली. या बैठकीत आमदारांनी आपल्या विधानसभा कार्यक्षेत्रातील पक्षाच्या कामगिरीचा अहवाल सादर केला. 

आज जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, मुरलीधर जाधव व महिला आघाडीप्रमुख शुभांगी साळोखे यांनी प्रा. मंडलिक यांची भेट घेतली. या भेटीत सर्वांनी तालुकानिहाय झालेल्या पक्षाच्या कामगिरीचा अहवाल प्रा. मंडलिक यांना सादर केला. गुरुवारी (ता. 2) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात त्यांनी जिल्हाप्रमुखांसह सहसंपर्कप्रमुखांसाठी भेटीची वेळ दिली आहे. या भेटीत जिल्ह्याचा तालुकानिहाय अहवाल त्यांच्याकडे दिला जाईल. या बैठकीत श्री. ठाकरे जो आदेश देतील त्याप्रमाणे जिल्हा परिषदेच्या सत्ताकारणात निर्णय घेण्याचे यावेळी ठरले. 

Web Title: Shiv Sena's decision will be on Thursday