शिवाजी चौक सुशोभीकरणासाठी आमदार क्षीरसागरांकडून 1 कोटी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 5 नोव्हेंबर 2016

कोल्हापूर - शिवाजी चौकातील छत्रपती शिवरायांच्या पुतळा परिसराच्या सुशोभीकरणासाठी आमदार राजेश क्षीरसागर यांनी एक कोटी रुपयांचा निधी दिला असून, हे काम लवकरच सुरू केले जाणार असल्याचे महापालिका प्रशासनाने स्थायी समितीच्या बैठकीत सांगितले.

पुतळ्यासमोरच्या रेलिंगचा भाग खराब झाला आहे. हा ऐतिहासिक पुतळा असून, स्फूर्ती देणारा आहे. त्यामुळे पुतळा परिसराचे सुशोभीकरण करावे, अशी मागणी निलोफर आजरेकर यांनी स्थायी समितीच्या बैठकीत केली होती. तसे निवेदनही त्यांनी स्थायी समितीत दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे, की छत्रपती शिवराय यांचा शिवाजी चौकातील पुतळा आंदोलकांचे स्फूर्तिस्थान आहे. पुतळ्याच्या आजबूबाजूचा परिसर, कठडे तुटले आहेत. दर्शनी भागात असणारा हा पुतळा सुशोभीत व्हायला हवा. या पुतळ्याला स्वातंत्र्यलढ्याची ऐतिहासिक पार्श्‍वभूमी आहे. त्यामुळे पुतळा आणि परिसराची देखभाल झाली पाहीजे. या प्रभागाचे नगरसेवक ईश्‍वर परमार, तसेच शिवाजी तरुण मंडळ आणि शहर अभियंता यांची संयुक्त बैठक घेऊन सुशोभीकरणाच्या कामाला गती द्यावी, अशी मागणी निलोफर आजरेकर यांनी निवेदनात केली आहे.