शिवाजी विद्यापीठात एक हजार मोर 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 मे 2017

कोल्हापूर - शिवाजी विद्यापीठात मोरांची संख्या सुमारे एक हजाराहून अधिक असल्याची माहिती संख्याशास्त्र अधिविभागाने केलेल्या सर्वेक्षणातून पुढे आली आहे. "लाइन ट्रान्सेक्‍ट सॅंपलिंग मेथड'द्वारे मोरांची गणना केली आहे. विद्यापीठातील कमी जागेत इतक्‍या मोठ्या प्रमाणात मोरांच्या आढळलेल्या संख्येचे कारण स्वच्छ पाण्याची मुबलक उपलब्धता असल्याचे सांगण्यात आले. 

कोल्हापूर - शिवाजी विद्यापीठात मोरांची संख्या सुमारे एक हजाराहून अधिक असल्याची माहिती संख्याशास्त्र अधिविभागाने केलेल्या सर्वेक्षणातून पुढे आली आहे. "लाइन ट्रान्सेक्‍ट सॅंपलिंग मेथड'द्वारे मोरांची गणना केली आहे. विद्यापीठातील कमी जागेत इतक्‍या मोठ्या प्रमाणात मोरांच्या आढळलेल्या संख्येचे कारण स्वच्छ पाण्याची मुबलक उपलब्धता असल्याचे सांगण्यात आले. 

संख्याशास्त्र अधिविभागाद्वारे गेल्या वर्षी दोन ते तीन वेळा सर्व्हे झाला होता. त्यामध्ये मोरांची संख्या चारशे असल्याचे दिसून आले होते. मात्र, हा सर्व्हे विद्यापीठातील अर्ध्या भागाचा होता. गणनेतील त्रुटी दूर करत यंदा मार्चच्या तिसऱ्या आठवड्यात पुन्हा सर्व्हे झाला. त्यासाठी नकाशा तयार केला. विद्यार्थी, विद्यार्थिनी, प्राध्यापक अशा 55 जणांनी त्यात भाग घेतला. प्रत्येक गटात सात विद्यार्थी होते. नकाशात दर्शविलेल्या अंतरानुसार त्यांना सर्वेक्षण करण्यास सांगण्यात आले होते. मोर किती अंतरावर आहे, त्या अंतराची नोंद घेण्यास सांगितले होते. 

विद्यार्थ्यांनी केलेल्या सर्वेक्षणातून 918 इतकी मोरांची संख्या दिसून आली. त्यानंतर पुन्हा दुसऱ्यांदा सर्व्हे झाला. त्यामध्ये ही संख्या एक हजार नऊ इतकी असल्याचे आढळले. विशेष म्हणजे दोन सर्वेक्षणांतून मोरांच्या गणनेतील आकड्यांतील फरक फारसा दिसून आलेला नाही. सर्व्हेचे शिस्तबद्ध व काटेकोरपणे झालेला तो परिणाम आहे. विद्यापीठाच्या 853 एकर परिसरातील झाडेझुडपे, साप, दलदलयुक्त पायवाटा यामुळे सर्वेक्षणाचे काम कठीण होते. सर्वेक्षणात कुणाला दुखापत होऊ नये, याची विशेष खबरदारी घेतली होती. संख्याशास्त्र अधिविभागातील डॉ. एस. बी. तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली एम. फिल. चा विद्यार्थी गजानन पाटील याने या सर्वेसाठी परिश्रम घेतले. प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, डॉ. डी. एन. काशिद यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. 

असा असतो मोर 
- मोराची (नर) मोठ्या पक्ष्यांत गणना. 
- मोराचा पूर्ण वाढलेला पिसारा 196 ते 225 सेंमी. 
- नर मोराची लांबी (चोचीपासून शेपूूट सुरू होईपर्यंत) 100 ते 115 सेंमी. 
- मोराचे वजन 4 ते 6 किलो. 
- लांडोर (मादी) आकाराने लहान. 
- भारतीय संस्कृतीत मोराला सर्वोच्च स्थान. 
- विद्यापीठाचे क्षेत्रफळ - 853 एकर. 
- मोराची राष्ट्रीय पक्षी म्हणून 1963मध्ये घोषणा. 

Web Title: Shivaji University has a thousand peacocks