पाणी फाउंडेशनच्या स्पर्धेत 10 गवात 78 हजार लोकांचे श्रमदान

water.
water.

मंगळवेढा - तालुक्यात पाणी फाउंडेशनच्या वतीने आयोजित केलेल्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत सहभागी झालेल्या 10 गावात 45 दिवसात 78 हजार लोकांनी श्रमदानात सहभाग घेतला. यामध्ये यंत्र व माणसाच्या सहायाने 15 लाख 25 हजार घनमीटर काम होवून पावसाळयात या कामात 152.5 कोटी लिटर पाणी साठा होणार आहे. यामुळे भविष्यात शेतकऱ्यांच्या जीवनात हरितक्रांती होणार आहे.

दुष्काळी गावासाठी वरदान ठरणाऱ्या या स्पर्धेचे दि 8 एप्रिल ते 22 मे दरम्यान या कालावधी पाणी फाउंडेशनच्या वतीने सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यामध्ये सुरुवातीला 54 गावे निश्‍चीतसाठी झाली यामध्ये 35 गावे पात्र ठरली. प्रशिक्षातून निवडलेल्या गावात या योजनेचे काम करावयाचे होते. पण प्रत्यक्षात 17 गावांनी काम सुरु केले. 10 गावांनी यात सातत्य ठेवले. श्रमदानातून कंपार्टमेंट बांध, शेततळे, रोपवाटीका, शोषखडडे, ओढा खोलीकरण, एल.बी.एस माती नाला बांध, कंटोल बांध, ही कामे खुपसंगी, आसवेवाडी, शिरसी डोंगरगाव कचरेवाडी लेंडवे चिंचाळे संतचोखोमेळा नगर लवंगी निंबोणी मारोळी या केली. गावात 2140 तास जेसीबी व पोकलेन यंत्राच्या सहयाने 15 लाख घनमीटरचे काम केले तर श्रमदानातून 25 हजार घनमीटरचे काम करण्यात आले. 

या कामाला भारतीय जैन संघटनेच्या वतीने 7 पोकलेन व 8 जे.सी.बी 45 दिवस उपलब्ध करुन दिले याशिवाय जे.एम.म्हात्रे कन्स्ट्रक्शन यांनी आसबेवाडीला पाच लाख रु,अस्तित्व संस्था सांगोला यांनी लेंडवे चिंचाळे या गावात 25 तास जे.सी.बी उपलब्ध करुन दिले सी.पी.बागल अ‍ॅन्ड कंपनी यांनी खुपसंगी व आसबेवाडीत पोकलेन उपलब्ध करुन दिले. माजी मंत्री सुशीलकुमार शिंदे धनश्री परिवार, आ भारत भालके, दामाजी कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे यांनीही मदत केली. उपविभागीय पोलिस अधिकारी दिलीप जगदाळे यांनी 50 हजार सीड बॉल उपलब्ध करुन दिले. याशिवाय वारी परिवार, स्वेरी पंढरपूर, जवाहलाल हायस्कूल, पतजंली योग समिती, दामाजी महाविदयालय कर्मचारी, राष्ट्रवादी कॉग्रेस, पत्रकार संघ, भैरवनाथ शुगर लवंगी, रतनचंद शहा बॅक मंगळवेढा यांच्या बरोबर पाणी फाउंडेशनचे जिल्हा समन्वयक सत्यवान देशमुख, जैन संघटनेचे राहूल शहा, मास्टर टेनर अ‍ॅड रविद्र पोपणे, पवन वाळुंज, नाथा भाऊ वसीम शेख, वैभव इंगळे जितेंद्र गडहिरे, प्रल्हाद वाघ यांच्यासह रत्नागिरी, कोल्हापूर, टेभूर्णी, मुंबई, सोलापूर येथील विविध संस्था व जलमित्रांनी सहभाग घेतला. 

शेतीच्या पाण्यावरुन 2009 लोकसभा निवडणूकीवर बहिष्कार टाकला. पाण्यासाठी शासनाची वाट न बघता गावातील राजकीय मतभेद बाजुला ठेवून जाणारे पाणी अडवण्यासाठीचे काम 58 हजार घनमीटर झाल्यामुळे 62 कोटी 70 लाख लिटर पाणी साठी होणार आहे. तरी या कामाची गती वाढण्यासाठी दै सकाळ चे सहकार्य मोलाचे ठरले.  
कलावती आसबे सरपंच

यापुर्वी कारखान्याच्या माध्यमातून गाळ काढण्याचे काम केले. पाणी अडवून जिरवण्यासाठी वाटर कप स्पर्धेत लोकांचा सहभाग पाहून आताही मदत केली. यात अन्य गावाचा सहभाग वाढणे गरजचे आहे. त्यांनाही मदत करणार असून, शासनाकडून देणाय्रा अनुदानात वाढ करावीआ भारत भालके 

दुष्काळी तालुक्यातील 10 गावात चांगले काम झाले हे काम तीन वर्षे चालणार असल्याने अन्य गावाचा सहभाग महत्वाचा असून सर्वच गावे सहभागी झाली तर दुष्काळी मुक्ती शक्य होणार आहे 
श्रीनिवास गंगणे तालुका समन्व्यक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com