श्री अंबाबाईचे अर्पण दागिने १६ कोटींचे

श्री अंबाबाईचे अर्पण दागिने १६ कोटींचे

कोल्हापूर - करवीर निवासिनी श्री अंबाबाईला भाविकांनी तब्बल सोळा कोटीहून अधिक किमतीचे दागिने अर्पण केले आहेत. सोने आणि चांदीच्या दागिन्यांचा यात समावेश असून देवीच्या प्राचीन, दुर्मीळ आणि हिरेजडित दागिन्यांचे मूल्यांकनही विधी व न्याय विभागाच्या परवानगीनंतर लवकरच पूर्ण केले जाणार आहे. 
दरम्यान,

मार्च २०१८ अखेर एकूण ५० किलो ९६३ ग्रॅम सोन्याचे तर ९४५ किलो २७५ ग्रॅम चांदीचे दागिने भाविकांनी देवीला अर्पण केले आहे. त्यानंतरच्या तीन महिन्यात ८८८ ग्रॅम सोन्याचे तर साडेपाच किलो चांदीचे दागिने आले असून सुमारे  सोळा कोटी इतकी सर्व दागिन्यांची किंमत आहे.

शासनमान्य मूल्यांकनकार पुरुषोत्तम काळे, योगेश कुलथे, उमेश पाठक यांनी दागिन्यांचे मूूल्याकंन चार जुलैअखेर पूर्ण केले. त्याची अधिकृत आकडेवारी आज पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, सचिव विजय पोवार यांनी जाहीर केली. २०१३-२०१४ आर्थिक सालापासून ते मार्च २०१८ पर्यंतच्या श्री अंबाबाई आणि जोतिबाच्या दागिन्यांचे मूल्यांकन झाले असून २०१७-१८ आर्थिक वर्षातील खर्चही यावेळी त्यांनी सादर केला. 

गेल्या आर्थिक वर्षात अंबाबाई, जोतिबा मंदिरासह समितीच्या अखत्यारीतीतील सर्व मंदिरात एकूण २१ कोटी पाच लाख पन्नास हजार इतके उत्पन्न मिळाले. एकूण १० कोटी १६ लाख २७ हजार रुपयांचा खर्च झाला असल्याचेही त्यांनी सांगितले. या वेळी समिती सदस्य शिवाजीराव जाधव, प्रमोद पाटील, सदस्या संगीता खाडे, सहसचिव शिवाजी साळवी आदी उपस्थित होते. 

सराफ असोसिएशनच्या पुढाकाराने अंबाबाईच्या प्रतिमांची सोने व चांदीची नाणी तयार करण्याचा प्रस्ताव आला आहे. याबाबत लवकरच निर्णय होणार आहे. 
- महेश जाधव, अध्यक्ष, देवस्थान समिती

अमूल्य दागिने
देवीच्या खजिन्यात मूल्यांकन न झालेले अनेक अमूल्य दागिने आहेत. परवानगीनंतर त्याचेही मूल्यांकन केले जाईल. सराफांच्या म्हणण्यानुसार एकेका हिरेजडित हाराची किंमत पाच कोटीहून अधिक होईल. देवीची कवड्याची माळ छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेली असावी, असे समितीतर्फे सांगण्यात आले. पण त्याचा अधिकृत पुरावा मिळालेला नाही.

समितीचे इतर निर्णय
अंबाबाईच्या जीर्ण मूर्तीबाबत तज्ज्ञ व भाविकांची मते जाणून घेतल्यानंतर पुढील निर्णय घेणार
नागाची प्रतिमा असलेले सोन्याचे किरीट दुरुस्तीबाबत कार्यवाही
अंबाबाई मंदिर परिसरातील १३ शिलालेख शोधून त्याचा अभ्यास
पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या जमिनींचे कर न भरणाऱ्यांच्या जमिनी काढून घेणार

१७८ वर्षांची परंपरा
बंगळूर येथील नाईक-तमन्नावर कुटुंबातर्फे प्रत्येक वर्षी देवीला सोन्याचे नाणे  सलग १७८ वर्षे या कुटुंबाची परंपरा सुरू 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com