पढेगावात आढळले दोन मजुरांचे मृतदेह

पढेगावात आढळले दोन मजुरांचे मृतदेह

श्रीरामपूर - तालुक्‍यातील पढेगाव शिवारात प्रवरा नदीकाठी आज दोन मजुरांचे मृतदेह आढळून आले. मृतदेहांशेजारीच दारूच्या बाटल्या पडलेल्या होत्या. त्यामुळे अतिमद्य सेवनामुळे त्यांचा मृत्यू झाला असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला. संतोष शिवा वाघमारे (वय 45) व रवींद्र सखाराम घोगरे (वय 25, दोघे रा. गायचूड, ता. रोहा) अशी त्यांची नावे आहेत. नेवरगाव (ता. गंगापूर) येथील विजय पवार या ठेकेदारकडे ते काम करत होते. सध्या पढेगाव येथे त्यांचे काम सुरू होते. तेथे सकाळी अकराच्या सुमारास ठेकेदार पवार गेले असता त्यांना वाघमारे व घोगरे दिसले नाहीत. शोध घेतला असता, त्यांच्या झोपडीपासून काही अंतरावर दोघांचे मृतदेह आढळले. पवार यांनी याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर निरीक्षक वसंत पथवे यांनी पथकासह घटनास्थळी भेट दिली. पंचनामा करून दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पढेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com