'सिद्धेश्‍वर'ची चिमणी पाडण्यासाठी वाढीव दराची मागणी 

Siddheshwar
Siddheshwar

सोलापूर : सिद्धेश्‍वर कारखान्याची चिमणी पाडण्यासाठी वाढीव दर देण्याची मागणी मक्तेदाराने केली आहे. दरम्यान, चर्चेला या निर्णय घेऊ, असे पत्र महापालिकेने मक्तेदाराला पाठविले आहे. 

सिद्धेश्‍वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी पाडण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यानी 15 सप्टेंबर रोजी महापालिकेस पाठविले होते. मात्र ते तब्बल चौथ्या दिवशी म्हणजे 19 सप्टेंबरला महापालिकेस मिळाले. त्यानंतर महापालिकेतील यंत्रणेने मक्तेदाराशी संपर्क साधला. त्यावेळी मक्तेदाराने वाढीव दराची मागणी केली. गेल्या आठवड्यात या मक्तेदाराबरोबर बैठक अपेक्षित होती. मात्र मक्तेदाराकडून प्रतिसाद न मिळाल्याने बैठक झाली नाही. मक्तेदाराने थेट पत्रव्यवहार केला आहे. 

गेल्या वर्षी झालेल्या करारानुसार मक्तेदारास 43 लाख रुपये देण्याचे निश्‍चित झाले होते. त्यापैकी आठ लाख रुपये मक्तेदाराने अनामत घेतली आहे. आता कर्मचाऱ्यांचा विमा आणि इतर तांत्रिक कारणासाठी जादा पैसे लागणार असल्याने वाढीव दर द्यावेत, अशी मागणी मक्तेदाराने केली आहे. त्यावर महापालिकेने बैठकीसाठी या बैठकीत चर्चा करून निर्णय घेऊ, असे प्रतिउत्तर पत्राने दिले आहे. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी पत्र देऊनही महापालिका प्रशासन चिमणी पाडण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत असल्याची चर्चा सुरु झाली आहे. या संदर्भात सहायक नगर रचना संचालक लक्ष्मण चलवादी यांना विचारले असता, ते म्हणाले,""न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले पत्र आम्हाला मिळाले आहे. त्यानुसार आम्ही प्रक्रिया सुरु केली आहे. टाळाटाळ करण्याचा कसलाही प्रयत्न नाही. न्यायालयाच्या आदेशनुसार कार्यवाही होईल.'' 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com