सिद्धेश्‍वर यात्रेस तैलाभिषेकाने प्रारंभ

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 जानेवारी 2017

सोलापूर - "एकदा भक्तलिंग हर्र बोला हर्रर्र...'च्या जयघोषात गुरुवारी सोलापूरच्या श्री सिद्धेश्‍वर यात्रेस प्रारंभ झाला. तब्बल 900 वर्षांची परंपरा असलेली ही यात्रा सोमवारपर्यंत (ता. 16) चालणार आहे.

सोलापूर - "एकदा भक्तलिंग हर्र बोला हर्रर्र...'च्या जयघोषात गुरुवारी सोलापूरच्या श्री सिद्धेश्‍वर यात्रेस प्रारंभ झाला. तब्बल 900 वर्षांची परंपरा असलेली ही यात्रा सोमवारपर्यंत (ता. 16) चालणार आहे.

परंपरेप्रमाणे मानाच्या हिरेहब्बू वाड्यातून श्री सिद्धेश्‍वरांच्या योगदंडाचे प्रतीक असलेल्या सात नंदिध्वजांची मिरवणूक आज सकाळी निघाली. सोलापूर शहर आणि परिसरात श्री सिद्धरामेश्‍वरांनी स्थापन केलेल्या 68 लिंगांना तैलाभिषेक करण्यात आला. या मिरवणुकीत पारंपरिक पोशाख असलेली बाराबंदी परिधान करून आबालवृद्ध सहभागी झाले होते. हिरेहब्बू वाड्यापासून सुरू झालेली ही संपूर्ण प्रदक्षिणा संपण्यासाठी तब्बल 26 किमीचे अंतर पायी कापावे लागते. शुक्रवारी (ता. 13) सिद्धरामेश्‍वरांचा अक्षता सोहळा होणार आहे.

सोलापूर - श्री सिद्धरामेश्‍वर यात्रेला गुरुवारी प्रारंभ झाला. यानिमित्त काढलेल्या नंदिध्वजांच्या मिरवणुकीत पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेले भाविक.

पश्चिम महाराष्ट्र

कोल्हापूर  - "रॅगवीड' या विदेशी विषारी तणाचा महाराष्ट्रात शिरकाव झाला आहे. सूर्यफुलांच्या बिया व पक्षी खाद्यातून...

04.45 AM

मिरज - बाप्पाच्या जल्लोषी स्वागतासाठी सराफ बाजारही सज्ज झाला आहे. गणेशाच्या अकरा दिवसांच्या आराधनेत त्याला सजवण्यासाठी-...

04.33 AM

कोल्हापूर - मनपा शिष्यवृत्तीचे आता राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती असे नामकरण करण्यात आले आहे. शिष्यवृत्तीची रक्कमही दुप्पट...

04.03 AM