शिलधी प्रतिष्ठानातर्फे ‘वृक्षाभिषेक रायगडा’ मोहीम

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 जुलै 2016

शिर्डी - शिलधी प्रतिष्ठानातर्फे नगरसेवक राजेंद्र कोते व प्रतिष्ठानाचे अध्यक्ष तुषार शेळके यांच्या पुढाकारातून रायगडावर वृक्षारोपण मोहीम राबविण्यात आली. तसेच विविध झाडांच्या बियांची लागवडही करण्यात आली. 

युवा नेते डॉ. सुजय विखे पाटील यांच्या पुढाकारातून सुरू करण्यात आलेल्या वनक्रांती अभियानास चालना देण्यासाठी ही मोहीम राबविण्यात आली. ‘वृक्षाभिषेक रायगडा’चा या नावाने ही मोहीम राबविण्यात आली. तीत सहभागी झालेल्या एकवीस युवकांनी वनक्रांती अभियान यशस्वी करण्याची प्रतिज्ञा केली. दर वर्षी किमान एका झाडाचे संगोपन करण्याचा संकल्प सोडला.

या मोहिमेवर रवाना होण्यापूर्वी या युवकांनी वनक्रांती अभियानात भाग घेऊन शहरात वृक्षारोपण केले. त्यानंतर झाडांची रोपे व बियांच्या पिशव्या सोबत घेऊन ते रायगडाकडे रवाना झाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृतींना वंदन करून त्यांनी तेथे वृक्षारोपण केले. तेथील रिकाम्या जागेत बियांची लागवड केली.  

याबाबत माहिती देताना अध्यक्ष तुषार शेळके म्हणाले, ‘‘शिलधी प्रतिष्ठानाच्या वतीने विविध सेवाभावी उपक्रम राबविले जातात. यंदा युवा नेते डॉ. सुजय विखे पाटील यांनी वनक्रांती अभियान हाती घेतले. त्यात आम्ही सक्रिय सहभाग घेतला. युवकांमध्ये उत्साह निर्माण व्हावा. यासाठी रायगडावर जाऊन वृक्षारोपण केले.’’

योगेश गोरक्ष, साईप्रसाद जोरी, मुकुंद डहाळे, प्रमोद पवार, बाळासाहेब महाडीक, शेखर सालकर, दिनेश कानडे, संतोष ढेंबरे, विकास शिंदे, गणेश लोखंडे, प्रसाद चव्हाण, नीलेश साळुंके आदी त्यात सहभागी झाले होते, असे त्यांनी सांगितले.