सोलापूर - मोहोळ येथे सर्पमित्र सर्पदंशानेच गंभीर जखमी

चंद्रकांत देवकते
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

मोहोळ (सोलापूर) : येथील सर्पमित्र दत्तात्रय मनोहर बुरांडे यास पकडलेल्या घोणस जातीच्या सापाने चावा घेतल्याची घटना मोहोळ येथे गुरुवारी (ता. १२) रात्री ९.३० वाजता घडली.

मोहोळ (सोलापूर) : येथील सर्पमित्र दत्तात्रय मनोहर बुरांडे यास पकडलेल्या घोणस जातीच्या सापाने चावा घेतल्याची घटना मोहोळ येथे गुरुवारी (ता. १२) रात्री ९.३० वाजता घडली.

मोहोळ येथे आमच्या  घरात साप निघाला आहे. लवकर या, असा फोन सर्पमित्र दत्तात्रय बुरांडे याला आल्यानंतर त्वरीत बुरांडे ज्यांच्या घरून फोन आला होता तिथे पोहचले व त्यांनी अतिशय कौशल्याने विषारी जातीच्या घोणस या सापाला पकडुन एका प्लॅस्टीकच्या बरणीत बंद केले. सापाला बंद केलेली ती भरणी घेऊन मोकळ्या जागेत सोडायला जात असताना रस्त्यात  बघ्यांच्या गर्दीने साप कसा आहे हे उत्सुकतेने विचारणा केली असताना बुरांडे यांनी बरणीत हात घालुन सापाचे तोंड पकडत लोंकाना दाखविण्याचा प्रयत्न करताच बुरांडे यांची सापाच्या तोंडावरील पकड सैल झाली व घोणसाने बुरांडे यांच्या हातालाच दंश केला.

तरीही तशा अवस्थेत सापाला पकडत असताना दुसऱ्यावेळी सापाने दंश केला. यावेळी उपस्थित असलेल्या तरुणांनी दत्तात्रय बुरांडे यांस मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र या ठिकाणी असलेल्या अपूऱ्या सोई सुविधा मुळे त्याला सोलापूर येथील शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असुन तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखी खाली बुरांडे या सर्पमित्रावर उपचार सुरू आहेत.

Web Title: snake bytes snake rescue person in solapur