सोलापूर शहराचा पाणीप्रश्न मिटला

विजयकुमार सोनवणे 
मंगळवार, 16 मे 2017

औज आणि चिंचपूर बंधारा प्रत्येकी साडेचार मीटर भरुन घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र हद्दीतील नदी काठचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे तर कर्नाटक हद्दीतील वीज पुरवठा सुरुच आहे

सोलापूर - उजनी धरणातून सोलापूर शहरासाठी सोडण्यात आलेले पाणी मंगळवारी पहाटे औज बंधार्यात पोचले. त्यामुळे किमान तीन महिन्याचा पाणी प्रश्न मिटला आहे.

औज आणि चिंचपूर बंधारा प्रत्येकी साडेचार मीटर भरुन घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र हद्दीतील नदी काठचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे तर कर्नाटक हद्दीतील वीज पुरवठा सुरुच आहे. तो बंद करण्यासाठी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले व महापालिका आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यानी विजयपूरच्या जिल्हाधिकार्याना पत्र लिहले आहे. सध्या शहराला चार दिवसाआड पाणीपुरवठा सुरु आहे आता तो परत तीन दिवसाआड होईल.