सोलापूर - शहराला आता नियमित पाणी

सोलापूर - शहराला आता नियमित पाणी

सोलापूर - शहरातील नागरिकांना दररोज पुरेसे पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी सरकारकडे 1. 87 टिएमसी (62.98 दलघमी) अतिरिक्‍त पाण्याची मागणी केली आहे. जून 2018 मध्ये त्याचा प्रस्ताव पाटबंधारे विभागाकडे पाठविला असून त्याला लवकरच मंजुरी मिळण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे आता संपूर्ण शहरातील नागरिकांना दररोज पुरेसे पाणी उपलब्ध होणार आहे. मात्र, त्याचे नियोजन महापालिका व लाभक्षेत्र विकास प्राधिकरणामार्फत होण्याची गरज आहे. 

विस्कळीत पाणी पुरवठ्याची कारणे 
- शहराला हिप्परगा तलाव, उजनीतून नदीद्वारे येणारे पाणी व थेट पाईपलाइनद्वारे पाणी येते 
- उजनीतून सोलापूर शहरासाठी असलेल्या पाईपलाइनला ठिकठिकाणी गळती 
- नदीद्वारे सोडलेल्या पाण्याचे बाष्पिभवन, शेती व जनावरांसाठी मोठा वापर 
- बेकायदा नळ कनेक्‍शन व शहरांतर्गत पाईपलाइनलाही काही ठिकाणी गळती 
- अतिरिक्‍त पाणीसाठा करण्याची ठोस सोयच नाही 

असे आहेत उपाय 
- एनटीपीसीच्या माध्यमातून सुरु असलेल्या पाईपलाइनमधून थेट पाणी आणणे 
- जुनी पाईपलाइन गरजेनुसार ठिकठिकाणी कायमची दुरुस्ती करणे 
- नदीद्वारे कमीतकमी पाणी सोडण्याची खबरदारी संबंधित यंत्रणेने घेणे 
- अतिरिक्‍त पाणी साठवण क्षमता निर्माण करण्यासाठी जलकुंभ बांधणे 
- शहरातील अनधिकृत नळ कनेक्‍शन बंद करणे व फुटलेली पाईपलाइन दुरुस्ती करणे 

एकट्या सोलापूर शहरासाठी दरवर्षी तब्बल 20 टिएमसी पाणी आरक्षित करण्यात आले आहे. नदीद्वारे सोडल्याने त्यापैकी 0.90 टिएमसी पाणी शहराला मिळते. उजनीवरुन असलेली पाईपलाइनलाही ठिकठिकाणी गळती आहे. आता शहराची 2031 ची लोकसंख्या गृहीत धरुन शासनाकडे अतिरिक्‍त पाण्याची मागणी केली आहे. त्यामुळे शहरवासियांना दररोज पाणी मिळेल. परंतु, महापालिकेकडून ठोस नियोजन होण्याची गरज आहे आणि पाणीपट्टी नियमित भरावी लागेल. 
- धिरज साळे, अधीक्षक अभियंता, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण 

- शहराला दररोज 215.55 दशलक्ष तर वर्षाला 78.68 दशलक्ष लिटर पिण्यासाठी पाणी 
- 1992 मध्ये शहरासाठी 25.55 दलघमी पाणी उचल परवाना 
- उजनीतील 20 टीएमसी पाणी सोलापूर शहरासाठी आरक्षित 
- उजनी धरणातून शहरासाठी सोडल्या जाणाऱ्या पाण्याचा करार 2008 मध्ये संपला 
- दहा वर्षांपासून दंडनिय आकारणीनुसार उजनी धरणातून पाणी उचलले जाते 
- शहरातील उद्योगांसाठी उजनीतून दररोज सोडले जाते 27 दशलक्ष लिटर पाणी 
- महापालिकेकडे सद्यस्थितीत सुमारे 72 कोटी रुपयांची पाणीपट्टी थकीत
- शहरातील उद्योगांसाठी दररोज 27 दशलक्ष लिटर पाणी लागते. त्यामध्येही वाढ करावी, असा प्रस्ताव जून 2018 मध्ये लाभक्षेत्र विकास प्राधिकरणातर्फे शासनाला सादर करण्यात आला आहे. त्यामुळे आगामी काळात उद्योगांसाठी पुरेसे पाणी उपलब्ध होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com