सोलापूरच्या महापौर, उपमहापौरांची आज निवड 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 मार्च 2017

सोलापूर - सोलापूरच्या महापौर व उपमहापौर निवडीसाठी बुधवारी (ता. 7) सकाळी 11 वाजता मतदान आहे. दोन्ही पदांसाठी प्रत्येकी चार उमेदवार रिंगणात आहेत. पक्षीय बलाबल पाहता भाजपच्या उमेदवारांचा विजय निश्‍चित असला तरी एमआयएम व शिवसेनेची भूमिका कायम राहणार की बदलणार, याकडे लक्ष लागले आहे. 

महापौरपदासाठी शोभा बनशेट्टी (भाजप), कुमुद अंकाराम (शिवसेना), प्रिया माने (कॉंग्रेस व राष्ट्रवादी आघाडी), नूतन गायकवाड (एमआयएम), तर उपमहापौरपदासाठी शशिकला बत्तुल (भाजप), अमोल शिंदे (शिवसेना), किसन जाधव (कॉंग्रेस व कॉंग्रेस राष्ट्रवादी आघाडी), अजहर शेख (एमआयएम) रिंगणात आहेत. जिल्हाधिकारी रणजित कुमार यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी 11 वाजता सभा सुरू होईल. सुरवातीला महापौर व त्यानंतर उपमहापौरांची निवड होईल. त्यानंतर नूतन महापौरांच्या अध्यक्षतेखाली स्थायी व परिवहन समितीच्या सदस्यांची नियुक्ती होणार आहे. निवडणुकीत एमआयएमचे सदस्य गैरहजर राहणार असल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरू होती. मात्र पक्षातर्फे उमेदवारी दाखल करीत एमआयएमने चर्चेला पूर्णविराम दिला. शिवसेनेनेही निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. भाजपने मुंबईत महापौर व उपमहापौरासह इतर कोणत्याही पदाच्या निवडणुका न लढविण्याचा ऐनवेळी निर्णय घेतला आहे. या पार्श्‍वभूमीवर सोलापुरात शिवसेना काय करते, याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल व गटनेता चेतन नरोटे यांनीही आपल्या चौदा नगरसेवकांसाठी व्हिप बजावला आहे.

Web Title: Solapur Mayor choice today