सोलापूर महापालिकेची विक्रमी कर वसुली

विजयकुमार सोनवणे
सोमवार, 2 एप्रिल 2018

दोन महिन्यात 22 कोटींची वसुली, 51 मिळकती सील

सोलापूर: मिळकत कराच्या थकबाकी वसुलीसाठी महापालिकेने राबविलेल्या दुसऱ्या विशेष मोहिमेत दोन महिन्यांत 22 कोटी 04 लाख 48 हजार 104 रुपयांची विक्रमी वसुली केली. 51 मिळकती सील केल्या,तर तब्बल 169 नळजोड बंद केले.

दोन महिन्यात 22 कोटींची वसुली, 51 मिळकती सील

सोलापूर: मिळकत कराच्या थकबाकी वसुलीसाठी महापालिकेने राबविलेल्या दुसऱ्या विशेष मोहिमेत दोन महिन्यांत 22 कोटी 04 लाख 48 हजार 104 रुपयांची विक्रमी वसुली केली. 51 मिळकती सील केल्या,तर तब्बल 169 नळजोड बंद केले.

शहर कर संकलन विभागाला 2017-18 या आर्थिक वर्षांसाठी 64 कोटी 13 लाख 50 हजार 875 रुपयांच्या वसुलीचे उद्दीष्ट होते. त्यापैकी मार्चअखेर 55 कोटी 75 लाख 23 हजार 458 रुपयांची वसुली करण्यात आली. या विभागाकडील कराची एकूण थकबाकी 135 कोटी रुपये होती. त्यापैकी आतापर्यंत 13 कोटी 65 लाख 32 हजार रुपयांची वसुली झाली आहे. चालू वर्ष आणि थकबाकीपैकी असे एकूण 69 कोटी 40 लाख 56 हजार रुपयाची वसुली झाली आहे.

हद्दवाढ विभागाला 42 कोटी 15 लाख 61 हजार 858 रुपयांचे उद्दीष्ट होते. त्यापैकी आतापर्यंत 36 कोटी 50 लाख 16 हजार 567 रुपयांची वसुली झाली. या विभागाकडे 84 कोटी 50 लाख 48 हजार 342 रुपयांची थकबाकी होती. त्यापैकी 18 कोटी 90 लाख 57 हजार 310 रुपयांची वसुली झाली. चालू वर्ष आणि थकबाकीपैकी मिळून 55 कोटी 40 लाख 73 हजार 877 रुपयांची वसुली झाली आहे.

जप्त मिळकतींचा होणार लिलाव
मिळकत कराच्या थकबाकीपोटी 51 मिळकती सील करण्यात आल्या. या मिळकतींचा लिलाव करण्याची सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत. दरम्यानच्या कालावधीत काही मिळकतदारांनी थकबाकी भरून सील काढून घेतले आहे. उर्वरीत मिळकतींच्या लिलावाची प्रक्रिया लवकरच सुरु करणार असल्याचे कर संकलन प्रमुख आर. पी. गायकवाड यांनी सांगितले.

Web Title: solapur municipal record tax recovery