राज्यातील चाळीस हजार तलावांमधील काढणार गाळ - मुख्यमंत्री

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 मे 2017

सोलापूर - जलयुक्त शिवार अभियान आता लोकचळवळ बनली आहे. ही योजना आता शासनाची राहिली नसून जनतेची झाली आहे. राज्यातील चाळीस हजार तलावांमधील गाळ टप्प्याटप्प्याने काढण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

मंद्रूप (ता. दक्षिण सोलापूर) येथील जिल्हा परिषदेच्या लघू पाटबंधारे विभागाच्या सीतामाई तलावाच्या खोलीकरणाचा शुभारंभ मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते आज झाला. या वेळी सहकारमंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, खासदार शरद बनसोडे, विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी आदी व ग्रामस्थ उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, जलयुक्त शिवार अभियानानंतर आता शासनाने गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार ही योजना सुरू केली आहे. या योजनेमुळे धरणातील गाळ काढल्याने धरणाच्या पाणी साठवण क्षमतेत वाढ होणार आहे. धरणातील पाणीसाठा वाढल्याने परिसरातील सिंचन क्षेत्रात वृद्धी होऊन याचा प्रत्यक्ष लाभ शेतकऱ्यांना होणार आहे. तसेच धरणातील गाळ शेतकऱ्यांच्या शेतात गेल्यावर जमिनीची सुपीकता व पोत वाढण्यास मदतच होणार आहे.''