सीना-कोळगाव क्षेत्रातील पिके धोक्‍यात

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 मे 2017

सोलापूर - सीना-कोळगाव धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत असल्याने धरण क्षेत्रातील पिके धोक्‍यात येऊ लागली आहेत. करमाळा तालुक्‍यातील हिवरे, मिरगव्हाण, फिसरे भागात पावसाळ्यापर्यंत पिके जगावीत यासाठी शेतकऱ्यांनी हजारो रुपये खर्च करून पाण्यासाठी चाऱ्या खोदल्या आहेत. कोळगावात काही ठिकाणी फक्त नदी पात्रात पाणी असून शेतकऱ्यांनी विद्युत पंप खाली घेतले आहेत. वेळेत पाऊस पडला नाही; तर येथील शेतकऱ्यांचीही चिंता वाढणार आहे. धरणाची पाणी साठवणक्षमता पाच टीएमसी आहे. 11 मे रोजी धरणात 77.21 दक्षलक्ष घ.मी. पाणीसाठा होता. सरकारच्या निर्णयानुसार धरणातून 3.50 दक्षलक्ष घममीटर पाणी सोडले होते. यापूर्वीही या धरणातून विविध कारणांसाठी पाणी सोडल्याने पाणीसाठा कमी झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.