अकलूजला जानेवारीत राज्यस्तरीय लावणी महोत्सव 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 नोव्हेंबर 2017

अकलूज - सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील जयंती समारंभ समितीच्या वतीने 26 व्या राज्यस्तरीय लावणी नृत्य स्पर्धेचे आयोजन ता. 5 ते 7 जानेवारी या काळात स्मृती भवन येथे होणार असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष जयसिंह मोहिते-पाटील यांनी दिली. 

समितीच्या वतीने गेल्या 25 वर्षांपासून राज्यस्तरीय लावणी नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यात महाराष्ट्रातील नामांकित संगीत पार्ट्या सहभागी होतात. पारंपरिक व व्यवसायिक अशा दोन गटांत या स्पर्धा होतात. स्मृतिभवनच्या बादशाही रंगमंचावर स्पर्धेत नावनोंदणी करण्यासाठी 9922330269 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे जयंती समितीच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे. यंदाचे वर्षे हे सहकार महर्षी कै. शंकरराव मोहिते पाटील जन्मशताब्दी वर्ष असल्याने त्यानिमित्ताने स्पर्धेबरोबरच आजपर्यंत स्पर्धेतील प्रथम क्रमांक व पुरस्कार विजेत्या पार्ट्याचे विशेष लावण्यांचे सादरीकरण होणार असल्याचेही माहिती मोहिते पाटील यांनी दिली. 

Web Title: solapur news akluj Lavani Festival