देवेंद्र फडणवीस होश मे आओ, जवाब दो

प्रमोद बोडके
रविवार, 20 ऑगस्ट 2017

सोलापुरातील चार हुतात्मा पुतळा येथून या मोर्चाला सुरवात झाली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. आज सकाळपासूनच सोलापुरात पावसाला सुरवात झाली आहे. पाऊस सुरू असतानाही या मोर्चासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समिती व समविचारी कार्यकर्ते एकवटले होते.

सोलापूर : देवेंद्र फडणवीस होश मे आओ, पोलिस होश मे आओ, शाहू-फुले-आंबेडकर आम्ही सारे दाभोलकर या घोषणा देत सोलापुरातील समविचारांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला चार वर्षे पूर्ण झाली तरीही मारेकऱ्यांना अद्यापपर्यंत अटक का झाली नाही? याचा जाब विचारण्यासाठी आज सोलापुरात जवाब दो मोर्चा काढण्यात आला. 

सोलापुरातील चार हुतात्मा पुतळा येथून या मोर्चाला सुरवात झाली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. आज सकाळपासूनच सोलापुरात पावसाला सुरवात झाली आहे. पाऊस सुरू असतानाही या मोर्चासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समिती व समविचारी कार्यकर्ते एकवटले होते. डॉ. दाभोलकर, गोविंद पानसरे, डॉ. एम. एम. कलबुर्गी यांच्या मारेकऱ्यांना तुम्ही कधी पकडणार? असे प्रश्‍न विचारत असलेले फलक यावेळी कार्यकर्त्यांनी गळ्यात अडकविले होते. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आल्यानंतर समितीच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

गोरक्षणाच्या नावाखाली चाललेली झुंडशाही बंद करा, दलित व मुस्लिमांवर होणारे हल्ले त्वरित थांबवा अशा मागण्यांचाही या निवेदनात समावेश आहे. यावेळी रवींद्र मोकाशी, यशवंत फडतरे, कुंडलिक मोरे, ब्रह्मानंद धडके, सुधाकर काशीद, उषा शहा, निशा भोसले, गोविंद पाटील, रा. गो. म्हेत्रस, शालिनी ओक, फारुख शेख यांच्यासह युवक व युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

 

Web Title: Solapur news Andhashraddha Nirmoolan Samiti agitation against government