अंगणवाडी सेविकांना इतर कामे नाहीत

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 31 जुलै 2017

महिला व बालविकास विभागाचे आदेश; अंगणवाडीच्या कामकाजावर परिणाम
सोलापूर - राज्यातील अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीस हे मानधनावर काम करणारे कर्मचारी आहेत. त्यामुळे त्यांना अंगणवाडीच्या कामाव्यतिरिक्त इतर कोणत्याही प्रकारची कामे लावू नयेत, असे आदेश महिला व बालविकास विभागाच्या वतीने दिले आहेत.

अंगणवाडी केंद्रात सहा वयोगटातील बालकांना पोषण आहार पुरविला जातो. त्याचबरोबर त्यांना पूर्वशालेय शिक्षण दिले जाते. नुकताच सरकारने विद्या प्राधिकरण पुणे यांच्यावतीने अंगणवाड्यांसाठी "आकार' नावाचा अभ्यासक्रम तयार केला आहे. तो अभ्यासक्रमही यापुढे अंगणवाडी सेविकांना जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांची मदत घेऊन शिकवावा लागणार आहे. त्यामुळे त्यांच्या आहे त्या शैक्षणिक कामावर त्यांना भर द्यावा लागणार आहे. त्याचबरोबर गर्भवती व स्तनदा माता यांना पोषण आहार, लसीकरण, आरोग्य तपासणी यासारख्या आरोग्यासंदर्भातील सेवा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून दिल्या जातात. त्यासाठी अंगणवाडी सेविका महत्त्वाची भूमिका बजावतात.
अनेकवेळा अंगणवाडी सेविकांना जिल्हा स्तरावरून गुड मॉर्निंग पथक, शेततळे बांधकाम, अन्न शिजवून देणे यासारखी कामे लावली जातात. त्याचा विपरीत परिणाम अंगणवाडीच्या कामावर होताना दिसत आहे. त्यामुळे अंगणवाडी सेविकांना एकात्मिक बालविकास सेवा योजनेव्यतिरिक्त इतर कोणत्याही स्वरूपाची कामे देऊ नयेत, असे परिपत्रक महिला व बालविकास विभागाने काढले आहे.

...तर घ्या सरकारची परवानगी
अंगणवाडी सेविकांना एकात्मिक बालविकास सेवा योजनेशिवाय इतर कोणतेही काम द्यायचे असल्यास सरकारची पूर्व मान्यता घेण्यात यावी. सरकारची पूर्व मान्यता घेतल्याशिवाय यापुढे कोणतेही काम अंगणवाडी सेविकांना देऊ नये, असेही या परिपत्रकामध्ये म्हटले आहे.

Web Title: solapur news Anganwadi employee do not have other works