विषबाधा झालेल्या शेतमजुरांपैकी एकाचा मृत्यू; प्रकरण दाबल्याचा आरोप

सुदर्शन हांडे
शनिवार, 28 ऑक्टोबर 2017

बार्शी (सोलापूर) : हिंगणी (ता. बार्शी) येथील शेतकरी आनंद मधुकर काशीद यांच्या ऑक्टोबर छाटणी नंतर द्राक्ष बागेत औषध लावल्याने चिखर्डे येथील सात शेतमजुरांना विषबाधा झाली होती. यातील अत्यवस्थ असलेल्या आनंद नानासाहेब माने (वय २२) याचा शुक्रावारी (ता. 27) रात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास सोलापूर येथे उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. सात शेतकऱ्यांना विषबाधा होऊन १४ दिवस होत आले तरी अद्याप संबधीत शेतकरी, ठेकेदार व औषध विक्रेता यांच्यातील कोणावरच कारवाई झाली नसून, तपासणी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी पैसे घेऊन प्रकरण दाबले असल्याचा आरोप शेतमजूरांच्या नातेवाईकांनी केला आहे.

या बाबत अधिक माहिती अशी की, हिंगणी (ता. बार्शी) येथील शेतकरी आनंद काशीद यांची १९ एकर द्राक्षबाग आहे. ऑक्टोबर छाटणी नंतर द्राक्ष काडी फुटण्यासाठी हायड्रोजन सायनामाईत हे कॅनब्रेक कंपनीचे औषध कापडाच्या साह्याने हाताने द्राक्ष काड्यांना लावण्यात येत होते. काशीद यांच्या शेतात शनिवार (ता. १४) सकाळी १० ते सायंकाळी ६ पर्यंत औषध लावण्याचे काम चिखर्डे येथील ११ तरुण शेतकरी करत होते. दिवसभर औषध लावताना शेतकऱ्यांचे अंगावर हे औषध उतरल्याने त्वचेतून विषबाधा झाली. काम संपल्या नंतर रात्री उशिरा शेतकऱ्यांना त्रास जाणवू लागल्याने बार्शीतील डॉ. जगदाळे मामा हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. आनंद माने याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याच दिवशी त्याला सोलापूर येथील अश्विनी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तब्बल १४ दिवस उपचार घेऊनही आनंद याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

हिंगणी येथे याच कामगारांनी याच शेतात द्राक्ष बागेला औषध लावले होते. पण दुपारी पाऊस आल्यामुळे औषध धूऊन गेले होते. त्यामुळे दुसऱ्या दिवशी पुन्हा द्राक्ष बागेत औषध लावण्यात येत होते. ढगाळ वातावरण असल्यामुळे औषधांची मात्र जास्त वापरली गेली असण्याची शक्यता आहे. हिंगणी भागात द्राक्ष बागा जास्त आहेत. त्यामुळे कामगार विकत नाहीत. म्हणूनच शेतकऱ्याने हे काम ठेकेदाराला दिले होते. ठेकेदाराने शेतमजूर कामाला लावताना हॅण्ड ग्लोज, मास्क, गॉगल असे सुरक्षा साधने न देताच त्यांना कामाला लावले होते.

घटना घडल्या नंतर तालुका कृषी अधिकारी संजय गायकवाड, पंचायत समिती कृषी अधिकारी अण्णासाहेब साठे, जिल्हा गुणवत्ता नियंत्रक अधिकारी अनिल कांबळे घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला होता. मात्र, अद्याप या घटनेत कोणालाच जबाबदार न धरता कसलीही कारवाई केलेली नाही. या घटनेतील तानाजी देठे या शेतमजुरावर सोलापूर येथे उपचार सुरू आहेत तर दोघांवर बार्शीतील जगदाळे मामा हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत. तिघांना उपचार करून घरी सोडण्यात आले आहे.

इतर विषबाधा झालेले शेतमजूरांची नावे पुढीलप्रमाणे-
तानाजी मोहन देठे (वय : २३), किरण मधुकर मसेकर (वय : २३), दत्तात्रय तुळशीदास चव्हाण (वय : २७), अक्षय हनुमंत सवणे (वय : १८), सागर जनार्धन सुतार (वय : २१), बाबू बापू ढवारे (वय : ४०).

Web Title: solapur news barshi death of one of the poisoned laborers