लोकवर्गणीतून 7 कि.मी.पर्यंत नदीचे खोलीकरण व रुंदीकरण

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 जून 2017

नदीवर यावर्षी बारा बंधाऱ्याचे काम करण्यात येत आहे.

बार्शी : येथे लोकवर्गणीतून सात किलोमीटर अंतरापर्यंत नदीचे खोलीकरण व रुंदीकरण करण्यात आले असून, सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. राजेंद्र भारूड यांनी बार्शी तालुक्यातील कारी गावाला भेट देऊन त्यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले.

मागील वर्षी ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून सात किलोमीटर अंतराचे नदीचे खोलीकरण व रुंदीकरण करण्यात आले होते. या कामाला तत्कालीन जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी भेट देऊन कौतुक केले होते.

यानंतर नदी खोलीकरणाचे काम ग्रामस्थांनी चालूच ठेवले. त्याच नदीवर यावर्षी बारा बंधाऱ्याचे काम करण्यात येत आहे. या जलपूजनासाठी आज डाॅ. राजेंद्र भारूड यांनी भेट देऊन नदीची पाहणी करून जलपूजन करण्यात आले.