अक्कलकोट: भीमा नदी तुडुंब; तालुका तहानलेलाच

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 2 सप्टेंबर 2017

मागच्या सहा महिन्यांपासून नदी पत्रात पाण्याचा साठा नव्हता. उजनीतून पाणी ऐन उन्हाळ्यात दहा बारा दिवस पुरेल इतकेच उपलब्ध होते.त्यामुळे भयंकर पाणी टंचाईला तोंड दयावे लागले होते.पण या आठवड्यात मघा नक्षत्राच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने उजनीने शंभरी गाठली आणि हिळ्ळीकरांचे व भीमेकाठच्या काठच्या शेतकऱ्यांचे नशीब उजळले.

अक्कलकोट : हिळ्ळी ता.अक्कलकोटच्या भीमा नदीवर महाराष्ट्राच्या हद्दीतील शेवटचा बंधारा आहे. उजनीतून सोडलेले पाणी शुक्रवारी दुपारी ३० हजार क्यूसेक प्रति सेकंद इतक्या प्रमाणात हिळ्ळी बंधाऱ्यातुन वाहत आहे.

दाखल झालेल्या पाण्याने भीमेचा दोन्ही काठ आज तुडुंब भरून काल रात्रीपासून बंधाऱ्यावरून वाहताना दिसले. प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिल्याने शेतकऱ्यांची मोठी धावपळ व लगबग दिसून आली.साधारणतः हिळ्ळी बंधारा परिसरात एक लाख क्यूसेक्स प्रति सेकंद इतक्या प्रमाणात पाणी आले तरी कोणताही धोका उद्भवत नाही.त्यामुळे सध्या तरी पाण्याची कोणतीही अडचण या भागाला नाही.आणि आजच्या प्राप्त परिस्थिती उजनीतून सोडण्यात येणारे पाणी कमी झाल्याने उद्यापासून प्रवाह कमी झालेला दिसेल.

मागच्या सहा महिन्यांपासून नदी पत्रात पाण्याचा साठा नव्हता. उजनीतून पाणी ऐन उन्हाळ्यात दहा बारा दिवस पुरेल इतकेच उपलब्ध होते.त्यामुळे भयंकर पाणी टंचाईला तोंड दयावे लागले होते.पण या आठवड्यात मघा नक्षत्राच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने उजनीने शंभरी गाठली आणि हिळ्ळीकरांचे व भीमेकाठच्या काठच्या शेतकऱ्यांचे नशीब उजळले. उजनीतून सोडलेले पाणी मोठ्या प्रमाणात असल्याने पाणी वेगाने हिळ्ळी बंधाऱ्यात येत आहे.भीमकाठाच्या हिळ्ळी परिसरातील अनेक गावांना उसाला पाणी देणे अशक्य झाल्याने त्याची वाढ खुंटली होती. याउलट चित्र मात्र अक्कलकोट तालुक्यात आहे. तालुक्यात गेल्या आठवड्यात पुरेसा पाऊस झालाच नाही.त्यामुळे भीमेकाठी पाऊस नसतानाही बंधारा भरून वाहत आहे.तर तालुका मात्र पावसाअभावी पाण्यासाठी तहानलेलाच आहे.