भाजप युवा मोर्चाच्या शहराध्यक्षपदी चालुक्‍य 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 सप्टेंबर 2017

सोलापूर - भाजप शहर युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी वृषाली चालुक्‍य यांची निवड केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ही जागा रिक्त होती. स्थायी समितीचे सभापती संजय कोळी यांच्यानंतर वृषाली चालुक्‍य यांची निवड केली आहे. भाजपने पहिल्यांदाच युवा मोर्चाच्या शहराध्यक्षपदाची जबाबदारी एका महिलेकडे दिली आहे. 

चालुक्‍य यांना त्यांच्या निवडीचे पत्र भाजपचे शहराध्यक्ष प्राध्यापक अशोक निंबर्गी यांच्या हस्ते आज भाजप कार्यालयामध्ये देण्यात आले. महापालिकेच्या निवडणुकीत चालुक्‍य यांच्या अर्जामध्ये चूक झाल्याने नगरसेवक होण्याची त्यांची संधी हुकली होती. या वेळी सरचिटणीस दत्तात्रय गणपा, हेमंत पिंगळे, शिखर बॅंकेचे संचालक अविनाश महागावकर, परिवहन समितीचे सभापती दैदिप्य वडापूरकर, अशोक कटके, जाकीर डोका, दत्तात्रय पोसा, मधुकर वडनाल, श्रीनिवास दायमा, सोमनाथ केंगनाळकर, नागेश पासकंटी, प्रभाकर गणपा, संतोष कदम, गणेश जाधव, व्यंकटेश कोंडी, अशोक बोयनाल उपस्थित होते. 

वृषाली चालुक्‍य 
पक्षाने मला दिलेल्या संधीचे सोने करण्यावर भर असेल. कौशल्य विकास योजनेचा युवकांना कशाप्रकारे उपयोग होईल याकडे लक्ष दिले जाईल. सोलापूर शहरातील युवक सोलापूरबाहेर जाऊ नयेत, त्यांना सोलापुरात व्यवसाय, उद्योग करता यावा यावर आपला भर असेल. गटातटापेक्षा पक्षासाठी काम करण्याला आपले प्राधान्य असेल. 
- वृषाली चालुक्‍य, शहराध्यक्ष, भाजप युवा मोर्चा