विद्यापीठे, महाविद्यालयांत सुरक्षेच्या उपाययोजना करा 

विद्यापीठे, महाविद्यालयांत सुरक्षेच्या उपाययोजना करा 

सोलापूर - महाविद्यालये व विद्यापीठांमध्ये रॅगिंग, दहशत पसरविणे आणि लैंगिक शोषण असे प्रकार वाढत आहेत. हे टाळण्यासाठी विद्यापीठे व महाविद्यालयांनी सुरक्षेच्या उपाययोजना करण्याच्या सूचना उच्च व तंत्रशिक्षण विभागाने दिल्या आहेत. नुकतेच या संबंधीचे पत्र राज्यातील विद्यापीठे व महाविद्यालयांना पाठविण्यात आले आहे. 

विद्यापीठे व महाविद्यालयामध्ये रॅगिंग, दहशत, प्रसंगी खून आदी घटनांमध्ये वाढ होत आहे. वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्या यांसारख्या प्रसारमाध्यमांमध्ये याचे वृत्तांकन होत असून, अशा गंभीर घटना सातत्याने होत असल्याचे निदर्शनास आले आहे. विद्यापीठे व महाविद्यालयांनी सुरक्षेच्या पुरेशा उपाययोजना न केल्याने अशा गंभीर घटनांमध्ये वाढ होत आहे. या संदर्भात उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी लक्ष घातले असून, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसंबंधी सर्व उपाययोजना करण्याचे आदेश उच्च व तंत्र शिक्षण विभागाला दिले आहेत. सोलापूर विद्यापीठानेही संलग्न महाविद्यालये आणि विद्यापीठातील विविध संकुलाच्या संचालकांना याबाबत कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. 

देशातील रॅगिंगच्या तक्रारींची स्थिती 
(18 एप्रिल 2012 ते 13 डिसेंबर 2017) 
- दाखल झालेल्या तक्रारी : 3305 
- तक्रारींचा निपटारा : 3151 
- कॉलसेंटरमध्ये सध्या दाखल असलेल्या तक्रारी : 72 
- देखरेख समितीकडे सध्या असलेल्या तक्रारी : 7 
- "यूजीसी'कडे सध्या असलेल्या तक्रारी : 75

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com