हमीभाव केंद्राकडूनच शेतकऱ्यांची लूट; कापसाला बाहेर जादा दर

अशोक मुरुमकर
मंगळवार, 14 नोव्हेंबर 2017

हमीभावापेक्षा बाहेरच जादा दर मिळत आहे. करमाळ्यात कापूस हमीभाव केंद्रही अद्याप सुरू  झाले नाही.

साेलापूर : हमीभाव केंद्राकडूनच शेतकऱ्यांची लूट होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. सरकारने कपसाला ४०२० ते ४३२० असा हमीभाव जाहीर केला. मात्र बाहेर त्याच्यापेक्षा जास्त दर मिळत अाहे.

मिरजगाव (जि. अहमदनगर) येथील एका खासगी कापूस विक्री केद्रावर करमाळ्याच्या शेतकऱ्याचा ४४०० रुपये क्विंटलने कापूस गेला. दुसऱ्या एका शेतकऱ्याचा ४३५० ने गेला. हमीभाव केंद्रावर सरासरी ४२०० रुपये दर मिळत असल्याचे मिरजगाव येथील बाजार समितीकडून सांगण्यात आले.

हमीभावापेक्षा बाहेरच जादा दर मिळत आहे. करमाळ्यात कापूस हमीभाव केंद्रही अद्याप सुरू  झाले नाही. सरकारच्या जाचक अटी अन् भावही कमी यामुळे शेतकरी हमीभाव केंद्राची वाट पाहत नाही. करमाळ्यातील अनेक शेतकरी चांगल्या दरामुळे मिरजगावला कापूस आणत आहे.

पावसाचा परिणाम...
यंदा पाऊस जादा झाल्यामुळे कापसाचे म्हणावे तसे उत्पन्न मिळत नाही. भोंड किडल्याने कापूस काळा निघत आहे. त्यामुळेही कमी दर मिळत असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :