सत्ताधारी नेहमीच कलेला घाबरतात: दिग्दर्शक अक्षय इंडिकर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 5 ऑगस्ट 2017

सोलापूरः "चार्ली चॅप्लिन आपल्या अभिनयातून नेहमीच अभिव्यक्त झालेला आहे. एवढ्या मोठ्या हिटलरलाही न घाबरता त्याने आपल्या कलेच्या जोरावर वेगळ्या पद्धतीने समाज वास्तव मांडले. त्याच्या चित्रपटांचा खूप मोठा परिणाम लोकांवर झाला. कला हे अभिव्यक्त होण्याचे माध्यम आहे, म्हणूनच सत्ताधारी हे नेहमीच कलेला घाबरतात.'' असे उदाहरणार्थ नेमाडे या चित्रपटाचे दिग्दर्शक अक्षय इंडिकर यांनी सांगितले. सकाळ कार्यालयास श्री. इंडिकर व चलचित्रनिर्माता (सिनेमॅटोग्राफर) स्वप्नील शेटे व यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे दिनेश शिंदे यांनी सदिच्छा भेट दिली.

"सिनेमा हा त्या काळाचे रूप मांडून ठेवतो. सिनेमा मुळे माणसात बदल होतात मात्र त्याची प्रक्रिया ही हळू होत असते. वेगवेगळे विषय घेऊन नवे काहीतरी देण्याचा प्रयत्न दिग्दर्शकाचा असतो. प्रेक्षकांनीही त्याला साथ द्यायला हवी. भारतीय प्रेक्षकांना फक्त पठडीतीलच चित्रपट आवडतात असे नाही तर वेगळ्या चित्रपटांकडे ते वळतात. प्रेक्षकांमध्ये सिनेमा साक्षरता वाढायला हवी. यासाठी चित्रपट रसग्रहण कार्यशाळा चांगली कामगिरी करू शकतात.'' असेही श्री. इंडीकर यांनी सांगितले.

श्री. इंडीकर म्हणाले, "माझे दहावी पर्यंतचे शिक्षण हे अकलूज येथे झाले. अकरावीसाठी पुण्यात गेलो व पुन्हा सोलापूर जिल्ह्यातील श्रीपूर येथे येऊन बारावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. विज्ञान शाखेमध्ये असलो तरी माझे मन मात्र पुस्तकात रमत होते. दोन वर्षात खूप कादंबऱ्या वाचल्या. सोलापुरात चित्रपट कार्यशाळेला गेल्यानंतर चित्रपट क्षेत्रात काम करण्याचा निश्‍चय केला. फिल्म टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया पुणे येथे प्रवेश घेतला. तिथे लॅटिन, अमेरिका, युरोप, फ्रेंच, इराण येथील चित्रपट पाहिले, त्यापासून प्रेरणा घेतली. चित्रपट क्षेत्रात करिअर करायचे म्हंटल्यानंतर माझ्या घरातून थोडा विरोध झाला. वडील प्राध्यापक व घरचे वातावरणही शिक्षणाला पूरक होते. यामुळे घरातील सर्वांनीच जास्त विरोध न करता मला पाठिंबा दिला.'

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सोलापूरच्या चित्रपट चावडी या उपक्रमाअंतर्गत उदाहरणार्थ नेमाडे हा चित्रपट दाखविला जाणार आहे. सहा ऑगस्ट रोजी मंगळवेढा येथील भारत टॉकीजमध्ये तर सात ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता सोलापुरातील शिवदारे महाविद्यालयात चित्रपट दाखविला जाणार आहे.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा: