सोलापूरः लिंग निदान व गर्भपात करणाऱया दोन डॉक्टरांवर गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 सप्टेंबर 2017

अकलूज (सोलापूर): माळशिरस तालुक्यातील सदाशिवनगर आणि मेडद येथील दोन डॉक्टरांनी लिंग निदान व गर्भपात करुन पुरावा नष्ट केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

अकलूज (सोलापूर): माळशिरस तालुक्यातील सदाशिवनगर आणि मेडद येथील दोन डॉक्टरांनी लिंग निदान व गर्भपात करुन पुरावा नष्ट केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

डॉ. विजयसिंह भगत (सदाशिवनगर) आणि डॉ. सुखदेव कदम (मेडद) अशी या डॉक्टरांची नावे आहेत. या डॉक्टरांच्या दवाखान्यात असे प्रकार सुरु असल्याची तक्रार फोंडशिरस येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य आधिकारी डॉ. प्रशांत दाते यांनी केली होती. त्यानंतर साधारणतः दोन महिन्यानी आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी या दवाखान्यात जाऊन तेथील दफ्तर ताब्यात घेतले होते. फोंडशिरसच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी तक्रार केल्यावर साधारणतः दोन महिन्यांनी या डॉक्टरांच्या दवाखान्यातील दफ्तर ताब्यात घेतले आहे. त्यामुळे तपास यंत्रणानी संबंधित डॉक्टरांना पुरावा नष्ट करायला संधी दिल्याचा आरोप होत आहे. मात्र, आता माळशिरस पोलिस ठाण्यात या डॉक्टरांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, लिंग निदान व गर्भपात करुन पुरावा नष्ट केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

अकलूज येथील प्रकरण ताजे असताना हा प्रकार उघडकीस आल्याने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या डॉक्टरांच्या शैक्षणिक पात्रता केवळ बीएएमएस व बीएचएमएस अशा आहेत.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :