भाजप नेत्याकडून करमाळ्यात शेतकऱ्यांना मारहाण

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 4 जून 2017

करमाळा- शहरातील सोनाई दुध डेअरीचे दुध संकलन बंद ठेवण्याचे आवाहन करण्यासाठी गेलेल्या शेटफळ येथील शेतकरी संघटनेच्या युवा कार्यकर्त्यांना करमाळा भाजप तालुक्याचे अध्यक्ष गणेश चिवटे व इतर 10 - 15 जणांनी जबरी मारहाण करुन आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केलाय.

मारहाणीत जखमी झालेले युवा शेतकरी सध्या करमाळा येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल असून या शेतकऱ्यांना मारहाण करुन भाजपा कार्यकर्तेच शेतकऱ्यांच्या विरोधांत पोलिसामध्ये तक्रार करण्यासाठी गेल्याचं पाहायला मिळालेय.

या प्रकाराचा व भाजपा सरकारचा जाहीर निषेध करत भापजच्या तालुका अध्यक्ष गणेश चिवटे यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी जखमी शेतकऱ्यांनी केलीय.