दिव्यांग निधी खर्चाची उपायुक्तांवर जबाबदारी

विजयकुमार सोनवणे
बुधवार, 15 नोव्हेंबर 2017

सोलापूर - महापालिका व नगरपालिकांच्या अंदाजपत्रकात दिव्यांगासाठी तरतूद असलेली तीन टक्‍क्‍यांची रक्कम ही संबंधित वर्षातच खर्च करण्याची अट सरकारने घातली आहे. तसेच, उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याकडे या विभागाची जबाबदारी सोपविण्याचे आदेश दिले आहेत. 

सोलापूर महापालिकेमध्ये दिव्यांगांसाठी असलेल्या तरतुदीबाबत असलेली अनास्था आणि तितकेच ‘निगरगट्ट’ अधिकारी या संदर्भात ‘सकाळ’ने वारंवार आवाज उठवला आहे. शहरातील दिव्यांगांसाठी महापालिकेच्या अंदाजपत्रकात केलेल्या कोट्यवधी रुपयांचा विनियोग झाला नाही. तरतूद निधी एका वर्षात शंभर टक्के खर्च झाला पाहिजे, असा आदेश सरकारने आता दिला आहे. काही दिवसांपूर्वी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याबाबत वक्तव्य केले होते. मात्र, सोलापूर महापालिकेतील संबंधित विभागाने त्या आदेशालाही केराची टोपली दाखविण्याचे ठरविले होते. आता सरकारच्या आदेशानंतर तरी दिव्यांगाबाबत महापालिका प्रशासकडून कार्यवाही होईल, अशी आशा आहे.