गजानन महाराजांना पावसाचे साकडे; पालखी सोलापुरात

विजयकुमार सोनवणे
मंगळवार, 27 जून 2017

पालखीचे यंदा 50 वे वर्ष आहे. पालखी जवळपास 650 वारकऱ्यांसह शेगाव येथून पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली. 

सोलापूर - 'गण गण गणात बोते' आणि विठुनामाचा जयघोष करीत मंगळवारी शेगावच्या श्री गजानन महाराजांच्या पालखीचे शहरात आगमन झाले. महापालिकेच्या वतीने पालखी व वारकऱ्यांचे भक्तिभावात स्वागत झाले.

महापौर शोभा बनशेट्टी यांनी सोलापूरवासीयांच्या वतीने पालखीचे स्वागत केले व  "श्रीं'ना साकडे घातले. पालखीचा दोन दिवस सोलापुरात मुक्काम राहणार आहे. उळे येथून सकाळी सहाच्या सुमारास श्री गजानन महाराजांची पालखी सोलापूरच्या दिशेने निघाली. सकाळी साडेनऊच्या सुमारास पालखीचे पाणी गिरणी चौकात आगमन झाले. भजन गात भगव्या पतका हातामध्ये घेतलेले वारकरी लक्ष वेधून घेत होते. महापौर बनशेट्टी व पोलिस आयुक्त महादेव तांबडे  यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून पालखीचे स्वागत झाले. 

पालखीचे यंदा 50 वे वर्ष आहे. पालखी जवळपास 650 वारकऱ्यांसह शेगाव येथून पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली. 

दर्शनासाठी झाली गर्दी
पाणी गिरणी चौकात पालखीच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. पूजेसाठी पालखी थांबविण्यात आल्यानंतर भाविकांनी दर्शन घेतले.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :
कट्टर मुस्लिम दहशतवाद संपवून टाकू; मोदी-ट्रम्प यांचे संयुक्त निवेदन
पुणे: चार धरणांत मिळून 0.12 टीएमसीने वाढ​
माण: बोअरवेलमध्ये पडलेल्या मंगेशचा अखेर मृत्यू
सलाहुद्दीनला ठरविले जागतिक दहशतवादी​
सर्जिकल स्ट्राइकवर एकही प्रश्‍न नाही: नरेंद्र मोदी​
मुख्यमंत्र्यांना विठ्ठल पूजेपासून रोखणार​
शाहू कार्यात तंत्रज्ञानाधारित रोजगाराची बीजं - डॉ. रघुनाथ माशेलकर​
३१ दिवस, पावणे चारशे तास आणि ४६ हजार पोळ्या​