फटाके व्यवसायावर नोटाबंदी, जीएसटीचा परिणाम

हुकूम मुलाणी
शनिवार, 21 ऑक्टोबर 2017

नोटाबंदीच्या काळात पैशाच्या अडचणीमुळे उत्पादन थांबले शिवाय दसरा सणातील पावसामुळे यंदा दिवाळी मागणी प्रमाणे पुरवठा करता आला नाही. शिवाय जीएसटीमुळे फटाक्याच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे ग्राहक कमी मिळाले. त्यामुळे या व्यवसायात यंदा अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही.
- आझाद दारुवाले, उत्पादक 

मंगळवेढा : दुष्काळी मंगळवेढा तालुक्यातीच्या दक्षिण भागातील भाळवणीच्या माळरानावर फटाके कारखान्याच्या माध्यमातून या परिसरात तरुणांना रोजगार मिळाला आणि कारखान्यात तयार होणाय्रा फटाक्याचा आवाज मात्र महाराष्ट्रभर दिवाळीच्या निमित्ताने वाजत असला तरी यंदाच्या दिवाळीत मात्र नोटाबंदी व जीएसटीचा परिणाम झाल्यामुळे हा व्यवसाय यंदा लाभदायक ठरला नाही.

तालुक्याच्या दक्षिण भागात एकही रोजगाराचे साधन नव्हते. वडीलार्जित असलेला या व्यवसायाला नटूलाल दारुवाले यांनी वाढवत सुरुवातीला लग्नातील वरात व मोजक्या कार्यक्रमाला ते स्वतः सायकलवरुन जावून ते दारुकाम स्वत करुन करुन हा व्यवसाय वाढवत पाणी नसलेल्या भाळवणीच्या माळरानावर सागर फायर वर्क्स हा फटाक्याच्या निर्मीतीचा कारखाना सुरु केला. महाराष्ट्रामध्ये दुष्काळी 35 गाव आंदोलनातील गाव म्हणून असताना आता मात्र फटाक्याची भाळवणी अशी ओळख होवू लागली. सागर फायर वर्क्समुळे या गावाच्या या परीसरातील तरुणाच्या हाताला काम मिळाले.

फटाक्यातील काही नमुने करण्यासाठी बाहेरगावच्या कामगाराच्याही आणावे लागले दिवाळीसाठी फटाके हे लहान मुलाचे आकर्षक असते. बाजारात चांगल्या आवाजाची व धोकादायक नसलेली फटाके या कारखान्यात तयार होवू लागली वेगवेगळया नमुन्यातील आकर्षक फटाके व तोफा आणि शॉटला व विविध ब्रँडला चांगली मागणी असते. आकाशात जावून प्रदुषण न करणाय्रा व या फटाक्यातून तयार होणाऱ्या विविध रंगछटा दर्शनीय असतात उत्पादित माल लगेच ग्राहक असल्याने वर्षभर या मालाला चांगली मागणी असल्यामुळे लांबून होलसेल विक्रेते व ग्राहक भाळवणीच्या माळरानावर येत असतात. त्यांनी केलेल्या या व्यवसायात आवताडे परिवाराचे मोठे सहकार्य पाठीशी राहिले. या व्यवसायात त्याना संकटाचा सामना करावा लागला. ती पार केल्याने या परिसरात या व्यवसाय टिकून आहे कामगारात व या परिसरात स्वताचे एक वेगळे अस्तित्व निर्माण केले सामाजिक व धार्मिक कार्यात नेहमी मदतीचा हात कायम ठेवला.

नोटाबंदीच्या काळात पैशाच्या अडचणीमुळे उत्पादन थांबले शिवाय दसरा सणातील पावसामुळे यंदा दिवाळी मागणी प्रमाणे पुरवठा करता आला नाही. शिवाय जीएसटीमुळे फटाक्याच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे ग्राहक कमी मिळाले. त्यामुळे या व्यवसायात यंदा अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही.
- आझाद दारुवाले, उत्पादक