सोलापूरः कैकाडी महासंघाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

 सोलापूर : महाराष्ट्रातील कैकाडी समाजावर असलेले क्षेत्रीय बंधन उठवावे या प्रमुख मागणीसाठी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करताना अखिल भारतीय कैकाडी महासंघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते.
सोलापूर : महाराष्ट्रातील कैकाडी समाजावर असलेले क्षेत्रीय बंधन उठवावे या प्रमुख मागणीसाठी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करताना अखिल भारतीय कैकाडी महासंघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते.

कैकाडी समाजावरील क्षेत्रीय बंधन उठवा

सोलापूर: महाराष्ट्रातील विदर्भ भागातील कैकाडी समाजाला अनुसूचित जातीच्या सवलती दिल्या जातात. पश्‍चिम महाराष्ट्र व कोकणासह उर्वरित भागातील कैकाडी समाजाला व्हीजेएनीच्या सवलती दिल्या जातात. विदर्भ व उर्वरित महाराष्ट्रातील कैकाडी समाजात रोटी बेटीचे व्यवहार होतात, त्यामुळे हे दोन्ही समाज एकच आहेत. राज्यातील कैकाडी समाजावरील क्षेत्रीय बंधन उठवावे व सर्वांना अनुसूचित जातीचा लाभ द्यावा अशी प्रमुख मागणी अखिल भारतीय कैकाडी महासंघाच्यावतीने करण्यात आली आहे.

या मागणीसाठी आज (गुरुवार) सोलापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महासंघाच्यावतीने एक दिवसाचे धरणे आंदोलन झाले. या मागणीसाठी 2000 पासून कैकाडी समाज संघर्ष करत आहे. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी हा प्रश्‍न सोडविण्यासाठी कार्यवाहीचे आदेश दिले होते. त्यानुसार निवृत्त न्यायाधीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त केलेल्या समितीने राज्य सरकारला अहवाल दिला आहे. विदर्भ व उर्वरित महाराष्ट्रातील कैकाडी समाज एकच असल्याचे त्यांनी या अहवालात नमूद केले आहे. तरी देखील या मागणीवर काहीच कार्यवाही होत नसल्याचे महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

वसंतराव नाईक आर्थिक विकास महामंडळाकडून समाजातील युवकांना कर्ज मिळावे. कैकाडी समाज कसत असलेल्या गायरान जमिनी त्यांच्या नावावर कराव्यात, मुद्रा लोन विना अट मिळावे, कैकाडी समाजावरील हल्ले व अत्याचार थांबवावेत, कैकाडी समाजाला घरकुल योजना द्यावी या मागण्यांचाही यामध्ये समावेश आहे. या आंदोलनात प्रदेशाध्यक्ष अनिल गायकवाड, उपाध्यक्ष संजय गायकवाड, पुरुषोत्तम गायकवाड, जिल्हा कार्याध्यक्ष किरण जाधव, सोलापूर जिल्हाध्यक्ष प्रमोद नंदुरकर, जिल्हा उपाध्यक्ष मदन गायकवाड आदी सहभागी झाले आहेत.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 
'प्रायव्हसी' हा मूलभूत अधिकार, जीवनाचा अविभाज्य घटक- सर्वोच्च न्यायालय
मोहर्रम असल्याने दुर्गा विसर्जनास परवानगी नाही: ममता बॅनर्जी
गौराईचं कौतुकच न्यारं... गौरी गणपतीच्या गाण्यांचा खजिना
ज्येष्ठांच्या पुढाकाराने सरला शिवारातला दुष्काळ
परभणी: कर्जाच्या विवंचनेतून शेतकर्‍याची अात्महत्या
सर केले तीन गड
तांदूळ, तीळ, मोहरीवर लिहिले सात ग्रंथ
कऱ्हाड: अठरा नख्यांचे कासव आढळले मृत अवस्थेत
बीड: चोरट्यांनी फोडली पोलिस ठाण्याजवळील सहा दुकाने
आजही 'ती' पुन्हा बिघडली; मेढा आगाराचा भोंगळ कारभार
प्लांट टिशू कल्चर लॅब’ सुरू होण्यापूर्वीच रद्द
ग्रामपंचायत करणार रस्त्यावर फलक लावून दारू विक्री
गवताचा बाप्पा आशीर्वादासाठी सज्ज! 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com