सभापतीच्या गाडीने घेतला अचानक पेट

अण्णा काळे
बुधवार, 27 सप्टेंबर 2017

करमाळा (सोलापूर) : करमाळा पंचायत समितीचे सभापती शेखर गाडे यांच्या गाडीला अचानक आग लागून गाडी पुर्णपणे जळाली आहे. ही घटना आज (बुधवार) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास देवळाली (ता. करमाळा) येथे घडली. सभापती शेखर गाडे व चालक शंकर गव्हाणे यांनी गाडीने पेट घेतल्याचे लक्षात येताच चालत्या गाडीतून उडी मारली.

करमाळा पंचायत समितीचे सभापती दुपारी केम येथून पंचायत समितीच्या बोलेरो गाडीने (क्रमांक एम एच 13 टी 346) पंचायत कार्यालयात जाण्यासाठी निघाले होते. शंकर गव्हाणे हे गाडी चालवत होते. तर सभापती शेखर गाडे बाजूला बसले होते. गाडी करमाळ्यापासून सात किमी अंतरावर देवळालीजवळ आल्यानंतर अचानक पेट घेतला. गाडीने पेट घेतल्याचे लक्षात येताच प्रसंगावधान ओळखून सभापती शेखर गाडे व चालकांनी उड्या टाकल्यामुळे त्यांचे जीव वाचले.

सभापती झाल्याबरोबर सभापतीसाठी असलेल्या गाडीची अवस्था पाहून आपण नवीन गाडीची मागणी जिल्हा परिषदेकडे केली आहे. अद्यापही नवीन गाडी दिली नाही. आज सुदैवाने वाचलो, अशी प्रतिक्रिया सभापती शेखर गाडे यांनी दिली.