मांज्यामुळे अडकलेल्या 13 पक्ष्यांना दिले जीवनदान

manja
manja

अग्निशमन दलाची कामगिरी, पतंग उडविताना काळजी घेण्याचे आवाहन

सोलापूर : पतंगाच्या दोरीमुळे (मांज्या) झाडे किंवा तत्सम ठिकाणी अडकलेल्या तब्बल 13 पक्ष्यांना महापालिका अग्निशमन दलाच्या जवानांनी जीव धोक्‍यात घालून जीवनदान देत निसर्गात सोडले. एप्रिल 17 ते जानेवारी 18 या कालावधीत त्यांनी ही कामगिरी केली. पतंग उडविताना पक्षी मांज्यात अडकणार नाहीत याची काळजी घ्यावी, असे आवाहन अग्निशमन दलाचे अधीक्षक केदार आवटे यांनी केले आहे.

मांज्यामुळे गळा कापल्याने महिलेचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच पुण्यात झाली. या पार्श्‍वभूमीवर मांज्यामुळे वारंवार संकटात सापडणाऱ्या पक्षांबाबतही चर्चा सुरु झाली आहे. संकटात सापडलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी जिवाची पर्वा न करता धावणाऱ्या महापालिका अग्निशमन दलाचा आता प्राणी-पक्ष्यांनाही आधार वाटत आहे. वाढत्या शहरीकरणाने भांबावून दुर्घटनाग्रस्त झालेल्या विशेषत: पतंगाच्या मांज्यामुळे संकटात सापडलेल्या पक्षांसाठी अग्निशमन दलाचे जवान देवदूतच ठरले आहेत.

वास्तविक पाहता, प्राणी आणि पक्ष्यांची सुटका करणे ही जबाबदारी अग्निशमन दलाची नाही; परंतु सामाजिक भान ठेवत नागरिक आणि पर्यावरण मित्रांच्या विनंतीवरून दल हेही काम करीत असते. कावळा, घार, मांजर, विविध प्रकारचे पक्षी, गाय यांचा समावेश आहे. उंचावर अडकलेले, पतंगाच्या मांजात पाय गुंतलेले, जखमी, विजेच्या तारेमध्ये, झाडाच्या फांदीत, घराच्या तावदानात अशा स्वरूपात हे पक्षी अडकलेले आढळले होते.

आकडे बोलतात..
यांना मिळाले जीवदान...

  • घार : 05
  • कावळा :05
  • साळुंखी : 01
  • कबूतर : 01
  • बगळा : 01

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com