कुरनूर धरणात केवळ 35 टक्के पाणीसाठा 

कुरनूर धरणात केवळ 35 टक्के पाणीसाठा 

अक्कलकोट  - अक्कलकोट तालुक्‍याची वरदायिनी समजल्या जाणाऱ्या कुरनूर धरणात आतापर्यंत केवळ 35 टक्के इतका पाणीसाठा झाला आहे. तालुक्‍यातील इतर प्रकल्प व साठवण तलावातील काही मोजके तलाव वगळता इतरत्र शून्य टक्के पाणीसाठा आहे. येत्या काळातील उत्तरा, हस्त व चित्रा नक्षत्राचा पाऊस पुरेसा न झाल्यास दोन वर्षांपूर्वी सारखी पाणीटंचाई उद्‌भवणार यात शंका नाही. 

कुरनूर धरणाच्या वरील तुळजापूर तालुक्‍यातील बोरी धरण हे अद्याप पूर्ण क्षमतेने भरले नाही. त्यामुळे नर व मादी धबधबा सुरू झाला नाही. कुरनूर धरणावरील बोरी नदी संथ वाहते आहे. तर हरणा नदीला पाणीच आले नाही. परिणामी कुरनूर धरणामध्ये आज सोमवारी फक्त 35 टक्के पाणी उपलब्ध आहे. या धरणाच्या पाण्यावरच अक्कलकोट, मैंदर्गी व दुधनी तसेच नदीकाठची कुरनूर ते बबलादपर्यंतची गावे यांची पाणीपुरवठा योजना व शेती अवलंबून आहे. यामुळे जसा जसा पावसाळा संपत येत आहे तसतशी शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडताना दिसत आहे. तालुक्‍यात आतापर्यंत नऊ मंडलमध्ये सरासरी 200 मिलिमीटर पाऊस झाला आहे. एकंदरीतच तालुक्‍याचा भीमाकाठ हा उजनी व वीर धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे पूरस्थितीत तर इतर तालुका मात्र पावसाअभावी कोरडा ठणठणीत असे चित्र सध्या दिसत आहे. 

साठवण तलावांचे चित्र 
लघु पाटबंधारे व साठवण तलावातील अचल पाणीसाठा वगळून उपलब्ध निव्वळ पाणी टक्केवारीमध्ये पुढीलप्रमाणे : गळोरगी 47.59, बोरगाव 24.74, चिकेहळ्ळी 18.08, भुरीकवठे 13.41, शिरवळवाडी 13.71 या पाच तलावांत थोडेबहुत पाणी उपलब्ध आहे. या उलट काझीकणबस, डोंबरजवळगे, घोळसगाव, सातनदुधनी व हंजगी तलावातील पाणीसाठा अद्याप मृतसाठ्यातच आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com