मंगळवेढ्यात खड्डेमय रस्त्यांमुळे दुचाकीस्वारांना धोका

हुकूम मुलाणी
बुधवार, 8 नोव्हेंबर 2017

ग्रामीण भागातून कारखान्याकडे टॅकरच्या माध्यमातून ऊस वाहतूक सुरु असून, ग्रामीण भागातील अरुंद रस्ते, व खडडे चुकविताना ट्रॅक्टर चालकांची कसरत करावी लागत आहे.

मंगळवेढा : तालुक्यातील गाळपासाठी जात असलेली ओव्हरलोड ऊस तोड वाहतूक व वाढलेल्या फिरंगीमुळे या रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकीस्वारांना धोका निर्माण झाला असून, खड्डे बुजवण्याबरोबर सार्वजनिक बांधकाम खात्याने ही काटेरी झाडे तोडावीत, अशी मागणी होत आहे

तालुक्यातील दामाजी, युटोपियन, फेबटॅक, भैरवनाथ या चार साखर कारखान्याचा गाळप हंगामाला सुरुवात झाली. गेल्या दोन तीन वर्षात ट्रॅक्टर चालकांना अपेक्षित उत्पन्न मिळाले नसल्याने वाहनावर असणारे कर्ज तसेच राहिले. त्यामुळे यंदा मागील हंगामापेक्षा व्यवसाय चांगला होणार असल्याने जादा ऊस भरून वाहतूक केली जात आहे. ग्रामीण भागातून कारखान्याकडे टॅकरच्या माध्यमातून ऊस वाहतूक सुरु असून, ग्रामीण भागातील अरुंद रस्ते, व खडडे चुकविताना ट्रॅक्टर चालकांची कसरत करावी लागत आहे.

वाहनात तांत्रीक बिघाड झाल्यास वाहन रस्त्यात थांबल्याने रस्त्यांची कमी रुंदी व काटेरी झाडे यामुळे वाहतूक विस्कळीत होते ग्रामीण भागातील रस्त्याच्या कडेला वाढलेली काटेरी झाडे न तोडल्यामुळे ऊस वाहतूक कसताना ही काटेरी झाडाची फांदी तुटण्याचे प्रमाण वाढले असून ती लोंबकळत राहिल्याने यांच मार्गावरून जाणाय्रा दुचाकीस्वारांना या लोंबकळणाय्रा काटेरी फांदीचा अंदाज येत नसल्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. उन्हाळयात बांधकाम खात्याने बुजवलेले खडडे परतीने पावसाने पुन्हा उखडले असून अगोदरच असलेले खडडे व वाढलेली काटेरी झाडे तोडण्याच्या दृष्टीने बांधकाम खात्याने लक्ष घालावे अशी मागणी होऊ लागले.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :