भैरवनाथ शुगरने रस्ता दुरूस्तीसाठी खर्च केले सात लाख रुपये

भैरवनाथ शुगरने रस्ता दुरूस्तीसाठी खर्च केले सात लाख रुपये
भैरवनाथ शुगरने रस्ता दुरूस्तीसाठी खर्च केले सात लाख रुपये

मंगळवेढा (सोलापूर): तालुक्याच्या दक्षिण भागातील अरुंद रस्त्याचा त्रास ऊस वाहतूक करणाऱया वाहनांबरोबर दुचाकी वाहनांना होवू नये म्हणून लवंगीच्या भैरवनाथ शुगरने सात लाखा पेक्षा अधिक रक्कम खर्च करुन साईट पटटी भरणे, खडडे बुजवणे व नवीन रस्ता तयार करणे या कामासाठी खर्च केला आहे.

तालुक्यात सध्या भैरवनाथ, दामाजी, फेबटॅक, युटोपियन या चार कारखान्यांचा गाळप हंगाम जोमात सुरु आहे. ऊस वाहतूक करणारी वाहनाची गर्दी रस्त्यावर वाढली आहे. सध्याची तोड नदीकाठच्या गावालगत सुरु आहे. तालुक्यातील चार पैकी लवंगी येथील भैरवनाथ साखर कारखान्याकरिता जाणारा मार्ग कमी रुंदीचा असल्याने या वाहनाला ओव्हरटेक करताना अन्य वाहनाला प्रतिक्षा करावी लागत आहे. प्रसंगी किरकोळ अपघातही होत असल्याने भैरवनाथ शुगर लि. या साखर कारखान्याने सलगर ते मरवडे या मार्गावरील साईड पटटी भरुन घेतली तर कारखाना ते उटगी हा तीन कि.मीचा नवीन रस्ता करुन घेतला तसेच कर्नाटक सिमेवरील चडचण पासून शिवनगी पर्यतच्या रस्त्याची साफसफाई करुन खडडे बुजवण्यात आले. या कामासाठी सात लाखापेक्षा अधिक रक्कम कारखान्याने खर्च केला. त्यामुळे ऊसवाहतूकीने अन्य वाहनाला होणारा त्रास वाचला आहे.

पंढरपूर तालुक्यातील येणारी ऊसाची वाहने अंतराची बचत व्हावी म्हणून खोमनाळ, भाळवणी, निंबोणी मार्गावरुन जात असतात मंगळवेढयापासून भाळवणी पर्यतचे खडडे आणि फिरंगीची झाडे अन्य वाहनाला त्रासदाय ठरु लागली. 15 डिसेबर पर्यत खडडे मुक्त महाराष्ट्र ही घोषणा बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली असली तरी तालुक्यातील सर्वच रस्त्याची अवस्था अतिशय वाईट असून, सिमावर्ती भागात तर मोठ खडडे पडले आहेत. कमी कालावधीत ही सर्व कामे नियोजित तारखेला पुर्ण होणे या खात्याला एक आव्हान ठरणार आहे. या विभागाकडे मंगळवेढत पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्याबाबत शासनाकडूनही याबाबत दखल घेतली जात नाही.

रस्ते दुरुस्तीची जबाबदारी या खात्याची पण वाहनधारकांना त्यांच्या वाहनाचे खड्ड्यामुळे नुकसान होवू नये. वेळेत ऊस गाळपास यावा म्हणून आम्ही दुरुस्तीबाबत स्वखर्च केला.
- अनिल सावंत कार्यकारी संचालक भैरवनाथ शुगर लवंगी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com