अनाथांना व निराधारांना 'माढा वेलफेअर'च्या ब्लॅकेटची उब

वसंत कांबळे
शुक्रवार, 19 जानेवारी 2018

कुर्डु (सोलापूर): समाजातील दुर्लक्षीत घटकांना जेव्हा कोण ओळख देत नाही व त्यांना जवळ घेत नाहीत तेंव्हा त्यांचा निवारा होतो सार्वजनिक ठिकाणे. अशा ठिकाणी यांचे अंथरुण असते जमिन व पांघरुण असते ते आभाळ हे ही उपेक्षित राहु नये म्हणून माढा वेलफेअरने त्यांना ब्लॅकेट पांघरून मायेची उब देण्याच काम केले आहे.

हिवाळा आला की थंडीची चाहुल लागते, अशा कडाक्याच्या थंडीमध्ये रेल्वे स्टेशन तसेच बस स्थानाकावरती कुठेतरी कोपऱ्यात समाजातील उपेक्षित तसेच निराधार व्यक्ती आढळून येतात. म्हणूनच आशा समाजातील उपेक्षितांसाठी आपण कही तरी देण लागतो, या माध्यमातून माढा वेलफेअर फौंडेशनच्या वतीने अश्या व्यक्तींसाठी थंडीपासून संरक्षण व्हावे या हेतूने सलग दुसऱ्या वर्षीही गोविंद वृद्धाश्रम टेंभुर्णी, वागळे फौंडेशन संचलित उम्मीद अनाथ आश्रम कुर्डुवाडी तसेच कुर्डूवाडी रेल्वे स्टेशन व पंढरपूर येथील दत्त घाट व पुंडलिक मंदिर परिसर व प्रभा हिरा पालवी अनाथ आश्रम पंढरपूर येथे उबदार ब्लॅकेट चे वाटप करण्यात आले.

यावेळी कल्याणी एंटरप्राइजेसचे मयूर नेवाळे, माढा वेलफेअर फौंडेशन अध्यक्ष धनराज दादा शिंदे, अर्जुनराव खटके सर, वाय.जी.भोसले सर, माढा तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष प्रथमेश खटके, सागर खटके, ओंकार नलवडे, अनिकेत शिरसठ, अमर संगीतराव, आनंद कोळी, राहुल वरपे आनंद पाणबुडे, महेश डोके, महेश मारकड, श्रीकांत पाटील, अतुल चोपडे, आकाश लांडगे, लक्ष्मण वरपे अमर शहा, मयूर शिंदे, सुहास लठ्ठे, दिलीप बिचितकर,  फिरोज मुजावर आदी उपस्थित होते.

Web Title: solapur news mhada welfare foundation blanket