खासगी शिकवणीसाठी लागणार महापालिकेची परवानगी 

खासगी शिकवणीसाठी लागणार महापालिकेची परवानगी 

सोलापूर - खासगी शिकवणी घ्यायची झाल्यास आता महापालिकेची परवानगी घ्यावी लागणार आहे. सोलापूर  महापालिकेने तब्बल 52 नव्या व्यवसायांचा यादीत समावेश केला असून, त्यासाठी वर्षाला 300 ते एक हजार रुपये परवाना शुल्क भरावे लागणार आहे.

सोलापूर महापालिकेच्या यादीत एकूण 83 व्यवसायाची नोंद होती. त्यामध्ये 32 व्यवसाय हे खाद्यपदार्थांशी संबंधित होते. अन्नसुरक्षा कायद्यानुसार खाद्यपदार्थांशी संबंधित सर्व व्यवसाय हे राज्य शासनाकडे वर्ग झाले. त्यामुळे महापालिकेच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट झाली. परिणामी, पालिकेच्या उत्पन्नवाढीसाठी हे नवीन 52 व्यवसाय महापालिकेच्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहेत. 

या व्यवसायाला घ्यावी लागणार परवानगी ः विजेचे साहित्य, उपकरणे, रेडिओ, टी.व्ही. टेपरेकॉर्डर, व्ही.सी.आर, व्हिडिओ, ऑडिओ, सीडी कॅसेट, व्हिडिओ कॅमेरा, संगणक, कॅल्क्‍युलेटरचा साठा आणि विक्री, सर्व प्रकारचे बुक स्टॉल, पुस्तके, मासिकांचा साठा व विक्री, सर्व प्रकारचे कपडे व रेडिमेड कपडे, होजिअरी माल व साठा-विक्री, प्रवासी बॅग्ज, पिशव्या, लेडीज पर्स, मनी पर्स, स्कूल बॅग्ज उत्पादन व साठा, सर्व प्रकारचे कटलरी, नॉव्हेल्टी, प्लास्टिक वस्तू, हार्डवेअर, लोखंडी, स्टील पोलादी माल, जीसीपी शिट्‌स, सर्व प्रकारची घड्याळे विक्री व साठा तसेच दुरुस्ती, वाहनांचे स्पेअरपार्ट, मशिनरी, यंत्रसामग्री, साठा व विक्री, पीव्हीसी पाइप, फिटिंग्ज, होस पाइप्स, रबर पाइप्स साठा व विक्री, ऍल्युमिनिअम, स्टील, चांदीची भांडी, सर्व प्रकारची दुचाकी, तीनचाकी, चारचाकी वाहनाचा शोरूममध्ये साठा व विक्री, सिमेंट वाळू, प्लॅस्टर ऑफ पॅरिस शाडू माती साठा व विक्री, घरगुती गॅस शेगडी, बत्ती, उपकरणे विक्री व दुरुस्ती, सॅनिटरी फिटिंग्ज, क्रॉकरी माल, सॅनिटरी, भांडी ग्लेजड टाइल्स साठा व विक्री, सर्व प्रकारचे खेळाचे साहित्य, व्यायामसाहित्य, सर्व प्रकारची औषधे साठा व विक्री, नारळ साठा व विक्री, इमारतीसाठी उपयोगी सामान, आरसे, ऍल्युमिनिअम सेक्‍शन, प्लायवूड हार्डबोर्ड, साकॅप्ट बोर्ड, सनमायका, लाकडी, लोखंडी, स्टील, प्लास्टिकचे फर्निचर, टाईपरायटर, सायक्‍लोस्टाईल मशिन, सायकल, बाबा सायकल, स्पेअर पार्ट, घरगुती क्रॉकरी, काच सामान, सोनारकाम हत्यारे, सोने, चांदी व इतर मौल्यवान धातूपासून तयार केलेली दागिने, कॅमेरे, फोटो रोल्स, फोटोग्राफीचे साहित्य, सनगॉगल्स, चष्मे साठा, वाहनांच्या बॅटऱ्या, वाहनांचे टायर, अगरबत्ती, धूप, धूपकांडी, टेलरिंग मटेरिअल, सुवासिक अत्तरे, पान, तंबाखू, ब्युटी पार्लर्स, स्कूटर, ट्रॅक्‍टर, मोटर, स्पिरीट, टर्पेंटाईल, चर्मकार दुकान, झेरॉक्‍स मशिनवर प्रत काढणे, संगणकावर प्रत काढणे, लॉंड्री, खत विक्री, कापूस पिंजणे, केबल व्यवसाय, मंगल कार्यालये, एसटीडी, आयएसडी बूथ चालवणे, मोबाईल फोनचा व्यवसाय, वेबसाइट तयार करणे, ट्रान्स्पोर्ट, खासगी शिकवणी, संगणक वर्ग, सायबर क्‍लास, कॉम्प्युटर कॉपेज, 12 लाखांपेक्षा कमी गुंतवणूक असलेले व्यवसाय. 

शासन मंजुरीनंतर होणार कार्यवाही 
हा प्रस्ताव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर होईल. त्यानंतर शासनाची मंजुरी मिळाली की त्याची कार्यवाही होणार आहे. या शुल्कामुळे महापालिकेच्या तिजोरीत वर्षाला 20 ते 25 लाखांची भर पडणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com