सोलापूर बाजार समितीत कांद्याला उच्चांकी दर

सोलापूर बाजार समितीत कांद्याला उच्चांकी दर

सोलापूर - सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये यंदाच्या हंगामात कांद्याला गुरुवारी प्रतिक्विंटल सर्वाधिक पाच हजार 250 रुपये भाव मिळाला. यंदाच्या हंगामातील हा सर्वाधिक दर आहे.

यंदाच्या वर्षी कांद्याच्या लागवडीमध्ये घट झाली आहे. त्यामुळे साहजिकच त्याचा परिणाम बाजार समितीमध्ये होणाऱ्या कांद्याच्या आवकेवर झाला आहे. कांद्याची आवक कमी झाली असून, बाजार समितीमध्ये आज 204 ट्रक कांद्याची आवक झाली होती. कमीत-कमी 200, तर सरासरी दोन हजार 300 रुपयांनी आज कांदा विकला गेला. यंदाच्या हंगामात कांद्याला आज सर्वाधिक पाच हजार 250 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला.

बाजार समितीमध्ये इतर जिल्ह्यांतूनही कांदा विक्रीसाठी येतो. यापूर्वी ऑगस्ट 2015 मध्ये बाजार समितीत कांद्याला प्रतिक्विंटल सात हजार 400 रुपयांचा भाव मिळाला होता. मात्र, त्या वेळी केवळ 73 ट्रक कांद्याची आवक झाली होती. आवक कमी असल्यामुळेच त्या वेळी जादा भाव मिळाला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com