दत्तक मुलांच्या शोधात पालक!

दत्तक मुलांच्या शोधात पालक!

सोलापूर - जिल्ह्यात अनेक पालक मुलांना दत्तक घेण्याच्या शोधात आहेत. मागणीच्या प्रमाणात दत्तक मुले उपलब्ध होत नसल्याने मुले देता का मुले, असे म्हणण्याची वेळ आली आहे. ऑनलाइन प्रक्रियेत सध्या ५० मुलांसाठी ६९ पालकांचे अर्ज आहेत. त्यात मुलींची संख्या जास्त आहे. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच संबंधित मूल दत्तक दिले जाते.

मुले दत्तक देण्यासाठी व घेण्यासाठी ‘कारा’च्या संकेतस्थळावर जानेवारी २०१७च्या नियमानुसार पालकांनी नावनोंदणी करणे आवश्‍यक आहे. त्यानुसार मुलांची नोंदणी केली जात आहे. नोंदणी केलेल्यांमध्ये १६ मुले व ३४ मुली आहेत. अनाथ, निर्धार व इतर प्रकारची मुले असल्याचे सांगितले जात आहे.

दत्तक मुलासाठी नोंदणी केल्यानंतर संबंधित पालकांना संपूर्ण देशातील मुलांमधून आवश्‍यक त्या मुलांची निवड करावी लागते. निवड केल्यानंतर संबंधित पालकाची कायदेशीर चौकशी केली जाते. त्यांना तीन राज्यांचा पर्यायही दिला जातो. 

योग्य त्या राज्याची निवड केल्यानंतर, कायदेशीर प्रक्रिया केल्यानंतर मूल दत्तक दिले जाते. सिंगल पालकांना (पुरुषांना) मूल दत्तक दिले जात नाही. पाखर संकुल व पंढरपूरमधील वासुदेव बाबाजी नवरंगे या संस्थांकडून संबंधित पालकांची चौकशी केली जाते. चौकशी अहवालानंतरच मूल दत्तक दिले जाते, असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विभागातील नितीन थोरात यांनी सांगितले.

अधिक माहितीसाठी...
अनाथ, निर्धार मुलांसह कोणीही मूल दत्तक देऊ शकतो व घेऊ शकतो, यासाठी www.cara.nic.in या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्‍यक आहे. या संकेतस्थळावर संपूर्ण माहिती दिली आहे. जगभरातून कोठूनही पालक मुलांसाठी नोंदणी करू शकतात. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्या कार्यालयात अधिक माहिती उपलब्ध आहे. 

‘त्या’साठीही असेच... 
सरकारच्या योजनांचा लाभ घेण्यासाठीही तीन मुले असतील तर एक मूल भाऊ, बहीण किंवा इतर कोणाला तरी दत्तक दिले जाते. परंतु ती प्रक्रिया बेकायदेशीर असते. मूल दत्तक देण्यासाठी व घेण्यासाठी ऑनलाइनच नोंदणी करावी लागते, असे महिला व बालविकास विभागाकडून सांगितले जात आहे.

दत्तक मुलांसाठी असे असते वय...
 मुलाचे वय    पालकांचे वय    दोघांचे वय

    ०-४    ९०     ४५+४५
    ४-८    १००    ५०+५०
    ८-१८    ११०    ५५+५५

अशी आहे प्रक्रिया... 
मूल दत्तक देण्यासाठी पालकांनी ‘कारा'च्या संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी करणे आवश्‍यक 
मुलाची संपूर्ण माहिती ऑनलाइन अपलोड करणे आवश्‍यक 
संबंधिताची चौकशी केली जाते 
गृहविभागाकडून चौकशी केल्यानंतर त्याचा अहवाल अपलोड केला जातो 
तीन राज्यांचा पर्याय (उदा. महाराष्ट्र, कनार्टक, गोवा)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com