अविरत व प्रामाणिक सेवेची ४० वर्षे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 मे 2017

सोलापूर - कोणतेही काम प्रामाणिकपणे आणि निःस्वार्थी भावनेने केल्यास उशिरा का होईना त्याचे फळ निश्‍चित मिळते. १० वर्षांच्या पाठपुराव्यानंतर मिळालेल्या ‘आसऱ्या’नंतर असाच अनुभव तुळजापूर वेस येथील गटई कामगार शिवाजी मग्रुमखाने ऊर्फ शिवानाना यांना आला आहे.

सोलापूर - कोणतेही काम प्रामाणिकपणे आणि निःस्वार्थी भावनेने केल्यास उशिरा का होईना त्याचे फळ निश्‍चित मिळते. १० वर्षांच्या पाठपुराव्यानंतर मिळालेल्या ‘आसऱ्या’नंतर असाच अनुभव तुळजापूर वेस येथील गटई कामगार शिवाजी मग्रुमखाने ऊर्फ शिवानाना यांना आला आहे.

गेल्या ३५ ते ४० वर्षांपासून ते महापालिकेच्या शाळेजवळ बसून  गटईची कामे करतात. ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता आपल्या सेवेला त्यांनी वाहून घेतले आहे. एखाद्याकडे पैसे नसले तर त्याचे काम मोफत करून देण्याचे सामाजिक भानही त्यांनी जपले आहे. वर्षानुवर्षे उघड्यावर व्यवसाय करावा लागत असल्याने शिवानाना यांनी खोक्‍यासाठी प्रशासकीय दरबारी पाठपुरावा सुरू केला. मात्र त्यास अपेक्षित यश मिळाले नाही.

दरम्यान, त्यांच्या कामाची दखल घेत ‘सकाळ’मध्ये ‘सामाजिक ऋण जपणारे शिवानाना’ हे विशेष वृत्त प्रसिद्ध झाले. वर्षानुवर्षे केलेल्या कामाची दखल म्हणून शासकीय योजनेतून ‘आसरा’ मिळावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली होती. परिसरातील कार्यकर्त्यांनी बातमीची दखल घेतली आणि समाजकल्याण खात्यामार्फत शिवानाना यांना खोके मिळवून दिले. वर्षानुवर्षे प्रामाणिकपणे केलेल्या कामाचीच ही पावती असल्याचे शिवानाना यांची भावना आहे.

ई सकाळवरील आणखी ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :
मॉन्सून आला रे! केरळच्या किनारपट्टीवर दाखल​
बारावीचा 89.50% निकाल; मुलींची बाजी​
'मोरा' चक्रीवादळाची बांगलादेशला धडक

गायक अभिजितचे ट्विटर अकाऊंट पुन्हा 'सस्पेंड'
यूपीत मंत्र्यांकडून बारचे उद्घाटन; योगींनी मागितले स्पष्टीकरण
एसएमबीटी हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये २१ बालकांना नवसंजीवनी
लग्नानंतर फ्रीज, सोन्याची साखळी मागणाऱ्या पतीला अटक
आपल्यासाठी देश प्रथम हवा: नौदल प्रमुख लांबा​