अक्कलकोटमध्ये आज संघर्ष यात्रा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 जून 2017

सोलापूर - राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, या मागणीसाठी अक्‍कलकोट विधानसभा युवक कॉंग्रेसच्या वतीने उद्यापासून (शनिवार) युवा किसान संघर्ष यात्रा काढण्यात येणार आहे.

सोलापूर - राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, या मागणीसाठी अक्‍कलकोट विधानसभा युवक कॉंग्रेसच्या वतीने उद्यापासून (शनिवार) युवा किसान संघर्ष यात्रा काढण्यात येणार आहे.

धोत्री (ता. दक्षिण सोलापूर) येथे सकाळी नऊ वाजता आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते व आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांच्या अध्यक्षतेखाली या यात्रेचा प्रारंभ होणार असल्याची माहिती संयोजक प्रा. पंडित सातपुते यांनी दिली. अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात ही यात्रा निघणार असून, पहिल्या दिवशी धोत्री ते कासेगाव या मार्गावर ही यात्रा निघेल. या यात्रेच्या माध्यमातून अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील 30 गावांमधील शेतकऱ्यांसोबत संवाद साधला जाणार आहे. 12 जून रोजी दुधनी येथे या यात्रेचा समारोप होणार आहे.