शालोपयोगी वस्तूंमध्येही ‘बाहुबली’ची चलती

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 जून 2017

सोलापूर- शाळा सुरू होण्यास अवघा एक आठवडा शिल्लक आहे. त्यामुळे बाजारातही पालकांची आणि बच्चे कंपनीची खरेदीसाठी गर्दी होत आहे. बाहुबली चित्रपटाची क्रेझ बच्चे कंपनीत असल्याचे दिसून येत आहे. बाहुबलीच्या प्रतिमा असलेल्या वस्तूंना विद्यार्थ्यांकडून मागणी आहे.

सोलापूर- शाळा सुरू होण्यास अवघा एक आठवडा शिल्लक आहे. त्यामुळे बाजारातही पालकांची आणि बच्चे कंपनीची खरेदीसाठी गर्दी होत आहे. बाहुबली चित्रपटाची क्रेझ बच्चे कंपनीत असल्याचे दिसून येत आहे. बाहुबलीच्या प्रतिमा असलेल्या वस्तूंना विद्यार्थ्यांकडून मागणी आहे.

पुढील आठवड्यात शाळा सुरू होणार आहेत. त्यामुळे शाळांमध्ये तयारी सुरू आहे. तसेच बाजारात दप्तर, वह्या, कंपास, रंगाचे खडू, चित्रकलेच्या वह्या, प्रयोगाच्या वह्या तसेच अनेक शालोपयोगी वस्तू बाजारात दुकानदारांनी विक्रीसाठी ठेवल्या आहेत. तसेच डबा, मुलांना आवडणारी चित्रे, विविध कार्टून असलेल्या वॉटर बॅग, फॅन्सी पेन्सिलही बाजारात आल्या आहेत. याशिवाय १००, २०० पानी तसेच त्याहूनही मोठ्या वह्यांची विक्री होत आहे. जगातील विविध आश्‍चर्ये, वैज्ञानिक सिद्धांत, गणितातील गमती अशी माहिती मुखपृष्ठावर असणाऱ्या वह्यांच्या विक्रीला विद्यार्थ्यांची अधिक पसंती असल्याचे दिसून येत आहे. तसेच कंपास, विज्ञान विषयासाठी लागणाऱ्या साहित्यालाही मागणी आहे. 

शहरातील नवी पेठ, विजापूर रस्ता, शेळगी, आसरा चौक, लष्कर आदी परिसरातील शालेय साहित्याच्या दुकानात पालक तसेच विद्यार्थ्यांची गर्दी होत आहे.

शालेय साहित्याच्या खरेदीस ग्राहक गर्दी करीत आहेत. बच्चे कंपनीकडून कार्टून तसेच विविधरंगी चित्रे असलेल्या वस्तूंची मागणी होत आहे. मात्र, दरवर्षीपेक्षा यंदा बाजारात सध्या तरी मंदी असल्याचे दिसत आहे.
 - श्रीनिवास कुंदूर, दुकानदार

पश्चिम महाराष्ट्र

टाकळी ढोकेश्वर (नगर): दुष्काळी भागात दर दोन वर्षांनी नैसर्गिक कारणांनी निर्माण होणार्‍या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी ही योजना...

01.48 PM

कोल्हापूर- जिल्ह्यात सोमवारी मध्यरात्रीपासून संततधार सुरुच आहे. सर्व पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असून मंगळवारी दुपारी...

01.27 PM

सुपे (नगर): अत्यंत गरिब परिस्थीतीतून माझ्या कुटुंबातील व शिक्षकांच्या पाठबळावर मिळालेला अण्णाभाऊ साठे पुरस्कार हा माझ्या जीवनातील...

01.27 PM