प्रत्येक शाळेसाठी ड्रेसकोड

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 जून 2017

सोलापूर - महापालिकेच्या प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आता वेगवेगळे ड्रेसकोड असणार आहेत. हा ड्रेसकोड कोणत्या रंगाचा असावा, याचा निर्णय संबंधित शाळेतील पालक व्यवस्थापन समिती घेणार आहे. 

सोलापूर - महापालिकेच्या प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आता वेगवेगळे ड्रेसकोड असणार आहेत. हा ड्रेसकोड कोणत्या रंगाचा असावा, याचा निर्णय संबंधित शाळेतील पालक व्यवस्थापन समिती घेणार आहे. 

गेल्या वर्षीपर्यंत महापालिका प्राथमिक शिक्षण मंडळामार्फत गणवेश निश्‍चित केला जात असे व मंडळामार्फतच गणवेशाचे वाटप केले जाई. त्यानंतर कापड उपलब्ध केले गेले आणि शाळेने ते शिवून घ्यायचे, अशा पद्धतीने गणवेश देण्यात आले. यंदा त्यात बदल करण्यात आला असून, आता पालकांनाच गणवेश खासगी दुकानांतून खरेदी करावे लागणार आहेत. पाल्य ज्या शाळेत शिकतो, त्या शाळेत कोणता ड्रेसकोड निश्‍चित केला आहे, त्यानुसार गणवेश घ्यावा लागेल. प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्येकी दोन गणवेश दिले जाणार आहेत. त्यासाठी प्रती गणवेश २०० रुपये, याप्रमाणे ४०० रुपयांचा धनादेश पालकांना दिला जाणार आहे. 

त्यासाठी गणवेश खरेदी करण्यात आल्याची पावती पालकांना शाळेत द्यावी लागणार आहे. पावती दाखविल्यानंतरच मुलाच्या नावाचा धनादेश पालकांना दिला जाणार आहे.

पूर्वी महापालिका शाळेसाठी एकच ड्रेसकोड होता. त्यामुळे एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमास या शाळेतील विद्यार्थी एकत्रित आले तर लगेच त्यांची ओळख पटत असे. मात्र, आता वेगवेगळ्या शाळांतील विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या रंगांचे गणवेश असतील. त्यामुळे कोणता विद्यार्थी महापालिका शाळेचा आणि कोणता विद्यार्थी खासगी शाळेचा, हे ओळखण्यात अडचण येणार आहे. ड्रेसकोडचा रंग निश्‍चित केल्यानंतर एकसारखे ड्रेस कोठे मिळतील, याचा शोध घ्यावा लागणार आहे. 

पहिल्या दिवशी गणवेशाची शक्‍यता कमी
महापालिकेच्या शाळा १५ जून रोजी सुरू होणार आहेत. त्यामुळे शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व विद्यार्थ्यांना गणवेश मिळण्याची शक्‍यता कमीच आहे. ३० जूनपर्यंत धनादेश जमा करण्याच्या सूचना शिक्षण मंडळाच्या वतीने मुख्याध्यापकांना देण्यात आल्या आहेत. 

पश्चिम महाराष्ट्र

टाकळी ढोकेश्वर (नगर): दुष्काळी भागात दर दोन वर्षांनी नैसर्गिक कारणांनी निर्माण होणार्‍या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी ही योजना...

01.48 PM

कोल्हापूर- जिल्ह्यात सोमवारी मध्यरात्रीपासून संततधार सुरुच आहे. सर्व पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असून मंगळवारी दुपारी...

01.27 PM

सुपे (नगर): अत्यंत गरिब परिस्थीतीतून माझ्या कुटुंबातील व शिक्षकांच्या पाठबळावर मिळालेला अण्णाभाऊ साठे पुरस्कार हा माझ्या जीवनातील...

01.27 PM